सांगली जिल्हा हादरला! धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू अन् तितक्यात भुकंपाचे धक्के!
सांगली - सांगली जिल्ह्यात आज भूकंपाचा धक्का जाणवला. चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. धरण परिसराला धोका नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. आज पहाटे सव्वाचारनंतर ही घटना घडली आहे.

यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंप झाला. सांगलीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार आहे. त्यामुळे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भुकंपाची घटना घडली. या घटनेनंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. तसेच हा भुकंपाचा धक्का तीन रिश्टरस्केलचा असल्याचेही सांगण्यात आले आहे.
भुकंपाच्या धक्क्याने नागरिक चिंतेत
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. गेल्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हे धरण 82 टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, त्याचवेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
10 दिवसांपुर्वीच मराठवाड्यात भूकंप
मराठवाड्यातील छत्रपती, संभाजीनगर. परभणी, नांदेड, हिंगोली, जालना आदी जिल्ह्यातील काही गावे तसेच विदर्भातील वाशिम जिल्ह्यात गत दहा दिवसांपुर्वीच भुकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. पण यात कोणतीही प्राणहानी झाली नाही ही चांगली बाब.
विदर्भातील वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. तर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता. याशिवाय, परभणी शहरासह सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. विशेषतः त्याआधाही हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वारंवार भुंकपाचे धक्के जाणवले होते.












Click it and Unblock the Notifications