Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Earthquake : मोठी बातमी सोलापूर जिल्ह्यात भूकंप!; पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यात 2.6 रिश्टरचे धक्के

Earthquake in Solapur district : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत, जिल्ह्यात तीन ठिकाणी हे धक्के बसले असून ते सौम्य असल्याचे वृत्त समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे वृत्त आहे.

कुठे बसले भूकंपाचे धक्के

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Earthquake in Solapur district

भूकंपशास्त्र केंद्राचे ट्वीट

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबत एक ट्विट केले आहे आणि भुकंपासंदर्भात थोडेसे वृत्त दिले आहे. सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरलली आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. मात्र, भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे.

शहाजी बापूंच्या सांगोल्यात भूकंपाचे केंद्र

शिवसेना पक्षात बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला जाणारे... काय हाटील फेम शहाजी बापू पाटील यांच्या गावात अर्थात सांगोल्यात भुकंपाचा केंद्रबिंदू आहे.

भूकंपामुळे म्यानमारमध्ये एवढ्या लोकांचा मृत्यू

मार्चच्या अखेरीस म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे प्रचंड विनाश झाला. ते दृश्य अजूनही अबाधित आहे. सुमारे पाच दिवसांपूर्वीम्यान म्यानमारमध्ये झालेल्या भयानक भूकंपातील मृतांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता 3 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. तर साडे चार हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि मृतांचा आकडा तीन हजारांपेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या भूकंपात 4321 लोक जखमी झाले असून 441 लोक अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती म्यानमारचे लष्करी नेते मिन आंग ह्लाईंग यांनी दिली. मंडाले आणि राजधानी नायपिडॉमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी झालेला हा भूकंप गेल्या शंभर वर्षातील आग्नेय आशियातील सर्वात विनाशकारी मानला जात आहे.

म्यानमारनंतर 2 मार्च 2025 जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के

म्यानमारनंतर 2 मार्च 2025 जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. त्यामुळे येथील प्रशासन आता जागे झाले आहे, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या क्युशू प्रदेशात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.34 वाजता 6.0 तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) नुसार, या भूकंपाचे केंद्र क्यूशू बेटावर होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+