मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली अन् परभणी जिल्ह्यात भूंकपाचे हादरे!
परभणी - महाराष्ट्रातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे हादरे आज सकाळी जाणवले. यामुळे या जिल्ह्यातील नागरीकांत भिती निर्माण झाली. 4.5 रिश्टर स्केल एवढी या भुकंपाची तिव्रता होती. अशी माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.
हा आहे केंद्रबिंदू
हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. यापूर्वीही हिंगोली जिल्ह्याला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.
घरातील भांड्यांची पडझड
परभणी, हिंगोली, नांदेड हे तीन जिल्हे मराठवाड्यात तर वाशीम जिल्हा विदर्भात येतो. या चार जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अचानक कंपन होऊन घरातील भांड्यांची पडझड यावेळी झाली. त्यावेळी काही नागरीक घाबरुन गेले होते.
नागरिक चांगलेच धास्तावले. गाढ झोपेत असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी नोंदवण्यात आली.
4.5 रिश्टर स्केलचा भूकंप
आज सकाळी या तीन जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचा धक्का बसला. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवला आहे. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भूकंपाचा हा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 4.5 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.
An earthquake of magnitude 4.5 on the Richter Scale occurred today at 07:14 IST in Hingoli, Maharashtra: National Center for Seismology pic.twitter.com/Dx1ToI8gsw
— ANI (@ANI) July 10, 2024
नागरिकांनो घाबरून नका
भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. नागरीकांची प्रशासन काळजी घेत आहे तसेच सहकार्य करा असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात 2021 मध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता त्यानंतर आजपर्यंतचा सर्वांत मोठा 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.












Click it and Unblock the Notifications