Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Breaking News : गडचिरोली, नागपूरमध्ये भुकंपाचे धक्के! तेलंगणातील मुलुगुमध्ये तीव्रता 5.3 रिश्टरस्केल

earthquake in Maharashtra Nagpur Gadchiroli : गडचिरोली आणि नागपुरात भुकंपाचे धक्के बसले. आज सकाळी साडे सात वाजेदरम्यान हे भुकंपाचे झटके बसले असून हे भूकंपाचे अतीसौम्य धक्के होते. तर तेलंगणामध्येही आज सकाळी सात वाजून 23 मिनिटादरम्यान वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, तेलंगणातील मुलुगु येथे भूकंपाचे हे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत या भूकंपामुळे कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे लोक घराबाहेर पडले.

earthquake in Maharashtra Nagpur Gadchiroli telangana

गडचिरोली शहरात आज सकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. घरातील टीव्ही, फ्रीज व अन्य वस्तू हलल्या, खिडक्यांची तावदाणेही वाजली. गडचिरोलीसह अहेरी तालुक्यातील अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली, सिरोचा तालुका, कोरची, आरमोरी इत्यादी तालुक्यांतही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्कयांमुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर गोळा झाले. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात आणि छत्तीसगड राज्याच्या काही भागातही भूकंपाचे धक्के बसले.

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथे आज सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 अशी नोंदविण्यात आली आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

तीन वर्षांत दोनवेळा भूकंपाचे धक्के

गडचिरोली जिल्ह्याला मागील तीन वर्षांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. 31 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी सिरोंचा, अहेरी, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ही तीव्रता 3.8 रिश्टर स्केल होती. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता ही दोन्ही भूकंपापेक्षा अधिक म्हणजे 5.3 रिश्टर स्केल एवढी आहे.

भूकंपात संरक्षण कसे करावे?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+