Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मला हलक्यात घेऊ नका नाहीतर टांगा पलटी होईल!; CMफडणवीसांशी संघर्षाच्या पार्श्वभुमीवर शिंदेंचे वक्तव्य

Don't take me lightly Eknath Shinde's warning : "मी कधी कधी म्हणतो की, या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका नाहीतर टांगा उलटेल..या दाढीने तुमची गाडी खड्ड्यात घातली." हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हे ताजे विधान सध्या खूपच चर्चेत आहे.

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन एकनाथ शिंदे हे काही काळ नाराज होते. त्यानंतर गृहमंत्रीपद शिवसेनेला हवे होते, त्यावरूनही भाजप शिवसेनेत धुसफूस होती अशा चर्चा होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यानच एकनाथ शिंदे यांचे वक्तव्याचा आता वेगवेगळा अर्थ लावला जात आहे.

Don t take me lightly  Eknath Shinde s warning

नेमके काय आहे एकनाथ शिंदेंचे वक्तव्य?

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्याची चर्चाच चर्चा सुरु आहे. पत्रकारांनी जेव्हा एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "मी तर आधीच सांगितले होते की, मला हलक्यात घेऊ नका. मी एक कार्यकर्ता आहे आणि तेही सामान्य कार्यकर्ता...मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे हे लक्षात घेतले पाहीजे की, मला हलक्यात घेऊ नये."

'2022 मध्ये टांगा पलटी केला होता..'

एकनाथ शिंदे म्हणाले, " 2022 मध्ये टांगा पलटी केला होता. सरकार बदलले होते आणि सामान्य जनतेचे सरकार आम्ही आणले. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नये. हा इशारा ज्यांना समजायचा त्यांनी समजावा."

महायुती आलबेल आहे का?

महायुतीत आलबेल आहे का..ही शंका अनेकांना येत आहे. यातच हा प्रश्न महाराष्ट्रातील अनेकांना मनात डोकावत आहे. कारण महायुतीचे मुख्यमंत्रीपदापासून खातेवाटपापर्यंत जे काही झाले त्यात नाराजीचे सुर अनेकदा ऐकू आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अचानक दरे गावी जाणे, प्रकृती अस्वास्थ आणि त्या काळात माध्यमांशी कमी झालेला संबंध असो की, दुसऱ्या फळीतील नेत्यांची भाजप नेत्यांना संबोधून केलेले वक्तव्य असो या सर्व घडामोडीच्या पार्श्वभुमीवर महायुतीत आलबेल असल्याचे अंदाज लावले जात आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या मात्तब्बर नेत्यांमध्ये कोल्ड वाॅर असल्याच्याही चर्चा आहे. काही मुद्द्यांवरुन उभय नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे सांगितले जात आहे, तशा चर्चाही रंगत आहेत, त्यामुळे हा इशारा एकनाथ शिंदेंनी ज्यांना द्यायचा त्यांना दिला असेही काही जण बोलत आहे. तर काहींना वाटते की हा इशारा भाजपला असू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+