Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डोंबिवलीत हृदयद्रावक घटना: 'तो' साखरझोपेतच त्यांचा कर्दनकाळ ठरला; चिमुकलीसह मावशीचा अंत!

Snake Bite Dombivli News : डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने प्राणवी भोईर (वय ३) या चिमुकलीचा आणि तिच्यासोबत झोपलेल्या मावशी श्रुती ठाकूर (वय २४) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतरात घडलेल्या या दुहेरी मृत्यूमुळे डोंबिवलीच्या आजदे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Snake Bite

(Image Credit : AI generated)

नेमकी घटना काय घडली?

डोंबिवलीतील आजदे गावात ही दुर्दैवी घटना घडली. प्राणवी भोईर ही तिची मावशी श्रुती ठाकूर सोबत झोपली होती. झोपेत असताना साप चावल्याने प्राणवी अचानक जोरजोरात रडू लागली. सुरुवातीला काय झाले हे कुटुंबीयांना कळले नाही. प्राणवीला तिच्या आईकडे दिल्यानंतर काही वेळातच श्रुतीलाही साप चावल्याचे लक्षात आले. तेव्हाच प्राणवीलाही सर्पदंश झाल्याचा संशय पक्का झाला.

तत्काळ दोघींनाही डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. मात्र, काही वेळातच प्राणवीची प्रकृती खालावली. तिला तातडीने ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु दुर्दैवाने तिथे तिचा मृत्यू झाला.

मावशीचाही उपचारादरम्यान अंत!

प्राणवीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मावशीवर म्हणजेच श्रुती ठाकूर यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच काल सोमवारी रात्री उशिरा त्यांचीही प्राणज्योत मालवली. अवघ्या तीन वर्षांची भाची आणि तिची २४ वर्षांची मावशी अशा दोघींचा अशाप्रकारे हृदयद्रावक मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

रुग्णालयावर गंभीर आरोप!

या दुहेरी मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात सर्पदंशावर योग्य उपचार न मिळाल्याने, वेळेत अँटी-स्नेक डोस न दिल्यामुळे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, "दोन्ही रुग्णांवर सर्पदंशावरील उपचार करण्यात आले होते आणि अँटी व्हेनम इंजेक्शनही देण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यामुळे प्राणवीला ठाण्यात हलवण्यात आले. तसेच, नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल आणि याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+