वाल्मिक कराडवर उपचार करणारे डाँक्टर संशयाच्या भोवऱ्यात? दमानिया-जरांगे दोघांचेही गंभीर आरोप
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही गाजत आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच उपचारावरुन आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा आरोप केला आहे.

काय आहे आरोप?
मनोज जरांगे यांचे सध्या आंतरवलीत उपोषण सुरु आहे. याच उपोषणा दरम्यान पत्रकारांनी वाल्मिक कराडबाबत जरांगे यांना प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले, सगळ्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. सगळ्यांकडे भरपूर माहिती आहे. या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा. कराड याचं दुखत नसताना देखील त्याचे डॉक्टर त्याचं दुखत असल्याचं सांगत आहेत. त्यांची चौकशी करा, त्याच दुखत नसताना त्याला दवाखान्यात का ठेवलं आहे? वाल्मीकला गुन्ह्यातून सोडण्यासाठी डॉक्टर आणि पोलीसांनी हे षडयंत्र केलं आहे का? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
दमानियांचा आरोप काय?
वाल्मिक कराड याच्यावरील उपचाराबाबत आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी पण मी ट्विट केलं होतं. काल जेव्हा मी त्याच्या रिपोर्टची माहिती घेतली तर त्या रिपोर्टसमध्ये त्याला काहीही झालं नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्याचे ब्लड रिपोर्ट देखील व्यवस्थित आहेत. फक्त अँटिबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो. त्याच्या सिटीस्कॅनमध्ये देखील काही आलेलं नाही. यावरून आपल्याला कळतंय की त्याची फक्त बर्दास्त ठेवण्यासाठीच त्याला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. या प्रकरणात जे हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली.
सिव्हिल सर्जनवर शंका
दमानिया यांनी सिव्हिल सर्जनवरही शंका घेतली. त्या म्हणाल्या, सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते, तेव्हा मला असं कळालं की ते राजकीय इन्कलाइन पर्सन आहेत. त्यांना लोकसभेची पण निवडणूक लढवायची होती. विधानसभेची निवडणूक पण लढवायची होती. त्यांची आधी नाशिकला ट्र्न्सफर झाली. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली, असा दावा दमानिया यांनी केला.












Click it and Unblock the Notifications