Diwali Rain Alert : दिवाळीत पावसाची एन्ट्री! मुंबई-पुण्यासह राज्यात 'या' दिवशी पडणार धो-धो पाऊस!
Diwali Rain Alert : दिवाळी म्हटलं की, पणत्यांची रोषणाई आणि उत्साहाचे वातावरण! मात्र, यंदाच्या दिवाळीच्या सुरुवातीलाच वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा थेट परिणाम वसूबारस, धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशीच्या सणांवर होणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाचा धुमाकूळ
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने १७ ऑक्टोबर (वसूबारस), १८ ऑक्टोबर (धनत्रयोदशी) आणि २० ऑक्टोबर (नरक चतुर्दशी) या दिवसांदरम्यान पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे हा पाऊस ढगांच्या गडगडाटासह होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या काही प्रमुख विभागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावासाची शक्यता आहे. जिल्ह्यांचा विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर, सातारा, बीड, सिंधुदुर्ग येथे पाऊस होऊ शकतो.
मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
वसूबारस आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने खालील प्रमुख जिल्ह्यांसाठी या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे, जिथे ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळू शकतात:
मुंबई आणि पुणे शहरांची स्थिती
मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आणि फराळ बनवणाऱ्या गृहिणींना थोडी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी नवीन संकट
मान्सून परतीच्या मार्गावर असतानाच बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या एका नवीन प्रणालीमुळे हा पाऊस सक्रिय होत आहे. त्यामुळे ऐन काढणीच्या वेळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची सुरक्षितता आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications