Diwali Holiday Schedule : फक्त भारतातच नाही तर या देशातही दिवाळीला मिळते सुटी! वाचा ते देश कोणकोणते
Diwali Holiday Schedule : दिवाळी आनंदाचा प्रकाशाचा सण..दिवाळी अनेक गोष्टींनी संस्मरणीय असते. लहानांपासून थोरांपर्यंत दिवाळीचा उत्सव अगदी थाटात आणि आनंदात साजरा होतो, आता दिवाळीला सुरुवात झाली. पुढील 5 दिवस हा उत्सव भारतात सर्वत्र साजराकेला जाणार आहे. हा विशेष सण दिव्यांचा सण आहे. देशात दिवाळीनिमित्त सर्व शाळा, महाविद्यालयांसह इतर शैक्षणिक संस्था, बँका, कार्यालयांना सुट्टी देण्यात येते.
दिवाळी आणि सुट्ट्या हे भारतात समीकरण आहे पण बऱ्याचदा भारतातील असे काही क्षेत्र आहेत तिथे दिवाळीला सुट्टी मिळत नाही. यामध्ये वाहतूक व्यवस्थेतील नोकरदार असो की, सुरक्षा माध्यमक्षेत्रातील सरसकट सर्वांनाच सुटी मिळते असेही नाही, पण काही देश असेही आहेत तिथे दिवाळीला सुट्टी मिळते. ते देश कोणते हे जाणून घेऊया.

अमेरिका दिवाळी सुट्टीचा कायदा मंजूर
भारतीय लोक मोठ्या संख्येने अमेरिकेत राहतात. तेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील व्हाइट हाऊसमध्ये दिव्यांची आरास केली जाते. अमेरिकेमधील पेनसिल्व्हेनिया राज्याने दिवाळीचा सण अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करणारा कायदा केलाय. हे विधेयक पेनसिल्व्हेनिया सिनेटमध्ये 50-0 ने मंजूर झाले.
या पेनसिल्व्हेनियामध्ये सुमारे 2,00,000 दक्षिण आशियाई राहतात आणि त्यांच्यासाठी दिव्यांचा उत्सव हा आनंदाचा प्रसंग आहे.न्यूयॉर्कमध्येही दिवाळीची सुट्टी देण्यात येते. 2023 मध्ये महापौरांनी दिवाळीनिमित्त शाळांना सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली होती. याठिकाणी दिवाळीसोबतच ईदचीही सुट्टी देण्यात येते.
'या' देशांमध्ये असते दिवाळीनिमित्त सुट्टी
नेपाळमध्ये दिवाळी सणाला स्वन्ति म्हणण्यात येते. तेथे हा सण 5 दिवस साजरा केला जातो. दिवाळीला या देशात सुटी दिली जाते.
श्रीलंकेमध्ये असंख्य तामिळ भाषिक लोक राहतात तेथील प्रांतामध्ये शासनाकडून सुट्टी देण्यात येते.
मॉरिशियस या देशामध्ये मोठ्यासंख्येने हिंदू धर्मिय राहतात. त्यामुळे तेथे दिवाळीनिमित्त शासनाकडून सुट्टी दिली जाते.
मलेशियामध्ये दिवाळीच्या निमित्ताने शाळा महाविद्यालये सरकारी आस्थापनांना सुट्टी असते. तेथे दिवाळीत ऑईल बाथ करण्याची पद्धत आहे.
सिंगाापूरमध्येही मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात, त्यामुळे तेथील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात येते. तेथे दिवाळीनिमित्त मोठ्या स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या शिवाय दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो या आफ्रिकंन आणि अमेरिकन खंडातील देशांमध्येही दिवाळीनिमित्त सुट्टी दिली जाते.












Click it and Unblock the Notifications