Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तुमचे मतं किती हे घ्या 4 हजार, संध्याकाळी पार्टीही भेटेल; संभाजीनगरात पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Assembly Election, Money Distribution Video Viral For Voting : तुमचं किती मतदान, हे घे चार हजार, मतदान झाल्यावर तुम्हाला पार्टी देण्याची जबाबदारी असे म्हणत असलेले लोक अन् पैशाचे होत असलेल्या वाटपाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आहे.

धक्कादायक म्हणजे पैसे वाटप करताना भाजपचा माजी नगरसेवक त्यात दिसून येत आहे. हा व्हिडिओ विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. त्यानंतर देखील इलेक्शन कमिशन कारवाई करत नसेल तर काय करायचे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Maharashtra Assembly Election 2024

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून त्यावर काय कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडिओत नेमकं काय दिसतंय?

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडिओमध्ये पाच ते सहाजण दिसून येत आहे. यामध्ये देवळाई तांडा येथे माजी नगरसेवक असल्याचं देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुमची किती मते..8 मतं तर हे घ्या 4 हजार रुपये...असं संभाषण होताना दिसत आहे. तसेच सदर प्रकार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले

विधानसभा निवडणुकीत एका मतासाठी मतदारांना दीड हजार रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. एक हजार देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेतले जात होते. तसेच मतदानाच्या दिवशी 500 रुपये देऊन बोटाला शाई लावून मतदान कार्ड परत घेऊन जायचे असा हा सर्व प्रकार असल्याचे आरोप केले जात आहे. सदर प्रकरणी जवाहरनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिरसाटांनी आरोप फेटाळले

तर हा सर्व प्रकार संजय शिरसाट यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच संजय शिरसाठ यांच्या फोननंतर पोलिसांनी दोन कोटी रुपये सोडून देण्यात आल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे. तर सदर प्रकरणावर शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+