आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, दिशा सालियन खून प्रकरणात तिच्या वडिलांनी केली गंभीर मागणी
Satish Salian allegations, Disha Salian gang raped and murdered Case : दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करण्याची मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी त्या्ंनी केली.
दिशा सालियनच्या वडिलांनी काय केली मागणी?
दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांनी मुंबईच्या हायकोर्टात एका याचिकेद्वारे काही मागण्या केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, आदित्य ठाकरे, दिनो मोरियाचे कॉल रेकॉर्ड तपासा एकता कपूर, सचिन वाझेचे कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे 3 ते 20 ऑगस्ट 2020 चे कॉल रेकॉर्ड चेक करा टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे अशी मागणीही सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे.

अभिनेत्री किशोरी पेडणेकरांवरही केले आरोप
त्यांनी या याचिकेत किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला. नितेश राणे, नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला. किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाचा खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिशा सालियनच्या पोस्ट मॉर्टेमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावेत दिशाच्या इमारतीचं 3 ते 10 जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावं. सतीश सालियन यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखावं. आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबल्याचा आरोप
पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबले. हा तपास म्हणजे काही शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठीचं नाटक होतं. ख-या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचल्या गेल्या. मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा नरेटिव्ह सेट केला. जे पुरावे समोर आले त्यानुसार अमानुष सामूहिक बलात्कार, खून झाला. अमानुष सामूहिक बलात्कारानंतर हत्या करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications