ड्रग्जचा व्यवसाय अन् मुलाला वाचविण्यासाठी पदाचा दुरुपयोगाचा आरोप; ठाकरे पिता-पुत्रांना अटक होईल?

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आता रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मंगळवारी दिशाचे वडील सतिश सालियान व वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पत्रकारांशी बोलताना या दोघांनी ठाकरे पिता पुत्रावर गंभीर आरोप केले. आदित्य ठाकरे यांचा थेट ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर ठाकरे पिता-पुत्रांना अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे.

Disha Salian death case

नेमके काय आहे प्रकरण?

दिशा सालियानचा मृत्यू हा अपघात नव्हता तर घातपात होता, असा आरोप दिशाचे वडिल सतिश सालियान यांनी केला. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली. त्यानंतर सतिश सालियान व त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना या दोघांनी आदित्य ठाकरेंसंह उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला आहे.

ठाकरेंवर काय आहेत आरोप?

दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत काही प्रश्न विचारले होते. दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते? याचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे, डिनो मोरया, सुरज पांचोली परमबीर सिंग, सचिन वाझे, रिया चक्रवर्तीला आरोपी करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला. त्यांनाही आरोपी करावं, असंही त्यांचं म्हणणं आहे. आदित्य ठाकरेंचा ड्रग्स व्यवसायात सहभागी आहे, असा त्यांचा थेट आरोप आहे. दिशाचा मित्र स्टिव्ह पिन्टो कुठं गायब झाला? याचीही चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

ठाकरेंना अटक होईल का?

दिशा सालियानच्या मृत्यूला पाच वर्षे झाली आहेत. मात्र आता दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशाच्या वडिलांनी पुन्हा चौकशी करण्याची मागणीची याचिका हायकोर्टात दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. आता दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली आहे आणि पुन्हा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. या आरोपांवरून एकच खळबळ उडाली आहे. दिशाच्या वडिलांचे आरोप पाहता व ड्र्ग्ज सारखे गंभीर प्रकरण पाहता आदित्य ठाकरेंची चौकशी होईल का, असे प्रश्न आता विचारले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+