Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबत मोठा खुलासा; 7,900 कोटींच्या संपत्तीची जबाबदारी कुणावर!

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा समूहाने गगनभेदी भरारी घेतली. सर्वच क्षेत्रात त्यांनी उल्लेखनिय काम केले. दरम्यान, रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबत मोठा खुलासा झाला असून त्यांनी त्यांच्या संपत्तीचे नियोजन कोणाच्या खांद्यावर दिले आहेत, याची माहिती समोर आली आहे.

रतन टाटा यांच्या पाठिमागे जवळपास 7,900 कोटींची मालमत्ता आहे. त्या संपत्तीबाबत टाटा यांनी मृत्यूपत्रात चार जणांवर त्याची जबाबदारी दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्यांचे जवळचे मित्र वकील डेरियस खंबाटा आणि सहकारी मेहली मिस्त्री यांच्या खांद्यावर मृत्यपत्रानुसार पुढील निर्णय घेण्याचे आणि अंमलबजावणीची जबाबदारी टाकली आहे. सोबतच त्यांची सावत्र बहीण शिरीन आणि डियना जीजीभॉय यांना पण त्यासाठी नेमले आहे.

RATAN TATA

नोएल टाटा टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष

रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 वर्षी निधन झाले होते. सध्या त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टाटा ट्रस्ट्सची टाटा समूहाची कंपनी टाटा सन्समध्ये 66% वाटा आहे. टाटा हा देशातील सर्वात मोठे औद्योगिक ग्रुप मानला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्समध्ये 0.83% हिस्सेदारी आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 7,900 कोटी रुपये होती. या संपत्तीमधील एक मोठा हिस्सा दान करण्यात यावा अशी टाटा यांची इच्छा होती. त्यांचा जवळपास तीन चतुर्थांश वाटा टाटा सन्समध्ये आहे. याशिवाय टाटाने ओला, पेटीएम, टॅक्सन, फर्स्टक्राय, ब्लूस्टोन, कारदेखो, कॅशकरो, अर्बन कंपनी आणि अपस्टॉक्ससह दोन डझन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. परंतु, त्यांनी त्यातील वाटा विकून टाकला.

रतन टाटा यांची संपत्ती किती?

मुंबईतील कुलाबा परिसरात त्यांचे मोठे घर आहे. त्यांच्याकडे अलिबाग येथील अरबी समुद्राजवळ एक हॉलिडे होम आहे. टाटा यांच्या मृत्यूपत्रात काय आहे हे समोर आलेले नाही. मेहली मिस्त्री रतन टाटा यांचे जवळचे आणि विश्वासू आहेत. तर सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या दोन्ही ट्रस्टचा टाटा सन्समध्ये एकूण 52 टक्के हिस्सेदारी आहे. समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये टाटा सन्सची हिस्सेदारी बाजाराच्या एकूण 16.71 लाख कोटी रुपये आहे. सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टाटा ट्रस्ट्सची टाटा समूहाची कंपनी टाटा सन्समध्ये 66% वाटा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+