Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Dhule News : धुळे जिल्ह्यात भीषण अपघात एसटी बस ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार!; 22 जण जखमी

Dhule News ST bus truck accident at Dabhashi : धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील भरधाव ट्रक आणि एसटी बसमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात एका आठ वर्षाच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून बसच्या चालक वाहकांसह २२ प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दभाषी फाट्यावर हा अपघात झाला.

महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाच्या शिरपूर-शिंदखेडा बसला भरधाव ट्रकची धडक बसल्याने हा अपघात घडला. सुत्रांच्या माहितीनुसार, नुपूर गणेश सोनवणे असे मृत मुलीचे नाव असून ती पाटण (ता. शिंदखेडा) येेथील रहिवाशी होती.

Dhule News ST bus truck accident at Dabhashi

ट्रक बसवर मधोमध आदळला

अपघातस्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंदखेडा आगाराची एमएच १४ बीटी २११२ या क्रमांकाची बस आज सकाळी शिरपूर कडून शिंदखेडा येथे जाण्यासाठी निघाली असतांना मुंबई-आग्रा महामार्गावरील दभाषी फाट्यावर पोहोचली आणि आरजे ११ जीसी ३४८७ या क्रमांकाचा ट्रक बसवर मधोमध आदळली. आज सकाळी साडेआठ वाजेला हा अपघात घडला.

२३ पैकी २२ प्रवासी जखमी

या अपघातात बसचे चालक शैलेंद्र परदेशी आणि वाहक राहुल सूर्यकांत विंचुरकर यांच्यासह बसमधील २३ पैकी २२ प्रवासी जखमी झाले आहेत. दभाशी गावाजवळील वळणावर बस वळण घेत असताना बस चालकाला समोरून भरधाव येणार्‍या मालमोटारीचा अंदाज घेता आला नाही यामुळे बस पुढे जाताच समोरून आलेली मालमोटार बसवर धडकली आणि हा अपघात झाला अशी माहिती मिळाली. या अपघातात जखमी व्यक्ती या शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील आहेत. जखमींना शिरपूर ग्रामीण तसेच धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरु

जयगडवरून कोल्हापूरला एलपीजीची वाहतूक करणाऱ्या ८० मेट्रिक टन क्षमतेच्या खासगी कंपनीच्या टँकरचा काल (२८ जुलै) रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ हातखंबा गावात वाणी पेठ इथे अपघात झाला. हा टँकर उलटून पुलाच्या खाली गेला. त्यामुळे वायुगळती सुरू झाली. जिल्हा पोलीस दल, एमआयडीसीचं बचाव पथक, तसंच जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. दरम्यान बचाव पथकांसह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या बचावपथकाला वायुगळती तात्पुरती थांबवण्यात यश आलं. दरम्यानच्या काळात गावातल्या नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं.

Dhule News ST bus truck accident at Dabhashi


अपघातग्रस्त टँकर सरळ करून त्यामधला एलपीजी दुसऱ्या टँकरमध्ये पाठवण्याचं काम करणारं विशेष वाहन आणि यंत्रणा पहाटे तीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. एलपीजी दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचं काम झाल्यावर अपघातग्रस्त टँकर बाहेर काढला. अपघात झाल्यानंतर लगेचच मुंबई-गोवा महामार्गावरची दोन्ही बाजूंकडची वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात टँकरचा चालक जखमी झाला असून, सुदैवाने अन्य जीवितहानी झालेली नाही. दरम्यान काम पूर्ण झाल्याने दुपारी सव्वादोनच्या सुमारास महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+