जे माझ्या खुर्चीवर डोळा ठेवतील, त्यांना नदीत फेका; मंत्री धर्मरावबाबा यांचा मुलीला थेट इशारा
Dharmaraobaba Atram on Sharad Pawar group : जी मुलगी बापाची होऊ शकली नाही, ती तुमची काय होणार, असा सवाल अजित पवार यांच्या गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाला केला. जो कोणी माझी खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करेन, त्याला नदीत फेकून द्या, असे आवाहन आत्राम यांनी जनतेला करत मुलगी भाग्यश्री व जावयाला थेट इशारा दिला आहे. जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. अहेरी येथे आज कार्यक्रम पार पडला.
जी बापाची झाली नाही, तुमची काय होणार
धर्मरावबाबा आत्राम पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार गट म्हणजे पक्ष फोडी करणारा, तोच पक्ष आता माझं घर फोडण्याचे काम करीत आहे. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल,असे धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाला सवाल केला. धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री ही परस्पर विरोधी शरद गटाकडून लढणार असल्याचा दावा केला गेला. या दाव्यामुळे वडिलांविरुद्ध मुलगी मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विरोधकांकडून मुलीला हाताशी धरलं जातंय
दरम्यान, मुलगी आपली साथ सोडणार असल्याच्या दाव्यावर धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार आहे. माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. आत्राम घराणं हलगेकर यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही.
एक गेलं तरी संपूर्ण कुंटुंब माझ्यामागे
आत्राम म्हणाले, जे माझ्या खुर्चीवर बसण्याच पाहतील त्यांना बाजूला करण्याचे काम मी करणार आहे. माझ्यासह माझ्या मतदारसंघातील लोक देखील त्यांना नाकारतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, मी या भूमीतील गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना सर्वांना समान न्याय दिला आहे. मी सतत काम करत आलो आहे. आता हे मध्येच येऊन हे अशा प्रकारचे वातावरण तयार करत असतील तर त्यांना वाट लावायचे काम आपल्याला करायचे आहे. मी इमाने इतबारे काम केले. 50 वर्षे या भूमीचे रक्षण करण्याचे काम केले आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार आहे.












Click it and Unblock the Notifications