Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

करुणा मुंडे प्रकरणात ट्विस्ट; मुलगा शिशीव म्हणतो, कौटुंबिक हिंसाचार वडिलांकडून नाही तर आईकडूनच..

आपणच मंत्री धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करुणा शर्माने केला होता. त्यांच्या कायदेशिर लढाईत आज कोर्टाने त्यांच्या बाजूने आदेश दिले. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत, असे आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिले. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशीव याने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आईवर गंभीर आरोप केले आहेत.

Dhananjay Munde

नेमके काय आहे प्रकरण?

आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत, असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. आज वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी, असे आदेश दिले. मात्र आता याप्रकरणी एक मोठा ट्वीस्ट आला आहे. धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशीव मुंडेने त्याची आई करुणा शर्मावर गंभीर आरोप केले आहेत.

शिशीवची स्टोरी चर्चेत

शिशीव मुंडे यांने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. कोर्टाच्या आदेशानंतर त्याने ही पोस्ट शेअर केल्याने चर्चा वाढली. त्यात त्याने मोठमोठे खुलासे केले. यात त्याने करुणा शर्माकडूनच माझे वडील धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचार व्हायचे असा आरोप केला आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

"मी, शिशीव धनंजय मुंडे आणि आता मला असं वाटतंय की मी प्रसारमाध्यमांशी बोलावं. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण माझं कुटुंब हा सध्या एक मनोरंजनाचा विषय बनवला जात आहे. माझे वडील हे कधीच सर्वोत्तम नव्हते. पण ते आमच्यासाठी कधीही घातकही नव्हते. पण माझी आई त्याउलट होती. तिला मानसिक आघात व्हायचे आणि त्यातून बाहेर पडण्याचे तिचे मार्ग खूपच वाईट होते. ती आम्हाला त्रास द्यायची. ती आता ज्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलत आहे तो ती माझ्यासोबत, माझ्या बहिणींसोबत आणि माझ्या वडिलांसोबतही करायची. माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला घर सोडायला सांगितलं. कारण तिच्यासाठी आमचं अस्तित्व नव्हतं. माझे वडील २०२० पासून आमची काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही. तिने मुद्दाम घराच्या कर्जाचे हफ्ते भरलेले नाहीत आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध काल्पनिक कथा रचत आहे. ती हे सर्व फक्त सूड घेण्यासाठी करत आहे", असे शिशीवने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्टोरीमुळे चर्चा वाढली

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र आता स्वतः मुलाने हे सर्व आरोप खोडून काढत आईवरच आरोप केल्याने या प्रकरणाच्या चर्चा वाढल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+