मोठी बातमी; पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंना वगळंल; नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री उशीरा पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. या यादीत अपेक्षेप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आला. या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे मिळाली आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाल्यावर आता बीडचे पालकमंत्री म्हणूनअजित पवार हे काम पाहणार आहेत.

धनंजय मुंडे यांना डच्चू
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासही मंत्री मुंडे यांनी दांडी मारली होती. तेव्हाच मंत्री मुंडे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे जाणवले होते. आज पालमंत्रीपदाच्या यादीत त्यांचे नाव कट करण्यात आले. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेच बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
फडणवीसांकडे गडचिरोली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असतील. धुळ्याची जबाबदारी ही जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.
कुणाकडे कोणते जिल्हे?
१. गडचिरोली- देवेंद्र फडणवीस
२.बीड - अजित पवार
३, मुंबई शहर- एकनाथ शिंदे
४. नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
५. छ.संभाजीनगर- संजय शिरसाट
६. जालना- पंकजा मुंडे
७. मुंबई उपनगर- आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री)
८. नाशिक- गिरीश महाजन
९. पुणे- अजित पवार
१०. ठाणे- एकनाथ शिंदे
११. अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे












Click it and Unblock the Notifications