करुणा शर्मांसोबत संबंध कसे जुळले?, धनंजय मुंडेंनी सांगितली त्यांची बाजू, म्हणाले- रिलेशनशिपमध्ये....
Dhananjay Munde vs Karuna Sharma : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर वाल्मीक कराड व त्यांच्या गॅगला अटक झाली. त्यानंतर वाल्मीक कराड यांच्या जवळचे असलेले आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
अशातच आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे-शर्मा यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा मिळावा, यासाठी करुणा मुंडे न्यायालयीन लढाई लढत आहेत. 5 एप्रिलला माझगाव कोर्टाचा निकाल करुणा यांच्या बाजूने लागला. त्यानंतर करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
करुणा शर्मा-मुंडे नेमक्या काय म्हणाल्या?
एका मराठी वृ्त्तवाहिणीशी बोलताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा संपर्क कसा आला, ते सांगितलं होतं. इंदौर येथे असलेल्या भैय्यूजी महाराजांच्या आश्रमात त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि मंदिरामध्ये लग्न झालं. लग्नासाठीचा संघर्ष करुणा मुंडेंनी सांगितला होता. आता धनंजय मुंडेंची देखील बाजू याबाबत पुढे आली आहे.

दोन लाखांची पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश
5 एप्रिल रोजी माझगाव कोर्टामध्ये करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल लागला. त्यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्यासंदर्भातला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टाने कायम ठेवला. या निकालाची कोर्ट ऑर्डर आता समोर आली. त्यामध्ये धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबतच्या नात्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
माझगाव कोर्टाच्या ऑर्डरनुसार धनंजय मुंडे काय म्हणाले?
माझगाव कोर्टाच्या ऑर्डरनुसार, धनंजय मुंडे आपली बाजू मांडताना सांगतात की, 21 मार्च 2001 मध्ये राजश्री मुंडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांच्यापासून त्यांना तीन मुलं आहेत. त्यानंतर 2012-13 मध्ये विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी मिळाली तेव्हा मुंबईला जाणं-येणं वाढलं. याच काळामध्ये करुणा शर्मा-मुंडे यांच्या सपर्कात आल्याचं धनंजय सांगतात.
करुणा पासून मला दोन मुलं झालीत, त्यांना माझं नाव दिलं
वकिलामार्फत धनंजय मुंडे यांनी कोर्टात त्यांची बाजू मांडली होती. त्यात मुंडे म्हणतात की, करुणा शर्मा यांच्यापासून आपल्याला दोन मुलं आहेत. माझं अगोदरच राजश्री मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं करुणा यांना माहिती होतं.
तरीही त्यांनी रिलेशनशीपमध्ये राहण्याची तयारी दर्शवली. परंतु मी आमदार झाल्यानंतर माझ्याकडे त्यांनी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. मी आमच्या दोन्ही मुलांना माझं नाव दिलेलं आहे.












Click it and Unblock the Notifications