धनंजय मुंडे यांना दुर्मिळ आजाराचं निदान, सलग 2 मिनिटही बोलता येत नाही
मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. याबाबत स्व:त धनंजय मुंडे यांनी टिट्ट करुन माहिती दिली आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या टिट्ट म्हटलं आहे की,'माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झालं आहे. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.
याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 20, 2025
त्याच दरम्यान मला…
बेल्स पाल्सी म्हणजे काय? बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याला लकवा मारणं.बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश (Paralysis) विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धं शरीर निकामी होतं. बेल्स पाल्सीमध्ये चेहरा एका बाजूने लटकल्यासारखा होतो. पेशंटला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या किंवा अर्धोन्मीलित राहतात. हा विकार होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.












Click it and Unblock the Notifications