Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मंत्री धनंजय मुंडे- करुणा शर्माचा नेमका वाद काय? काय आहे नातं? वाचा सगळी माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभरात एक बातमी चांगलीच चर्चेत आली. ती बातमी होती मंत्री धनंजय मुंडे यांची. मंत्री मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचारात दोषी ठरवून करुणा शर्मा यांनी लावलेले आरोप आज कोर्टाने मान्य केले. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले. आता हे सगळं प्रकरण काय? करुणा मुंडे कोण आहेत? धनंजय मुंडेसोबत त्यांचा संबंध काय? हे प्रश्न पडू लागलेत. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपण शोधूयात...

Dhananjay Munde

कोर्टाने काय दिले आदेश?

मंत्री धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले असून, करुणा शर्मा यांचे आरोप कोर्टाने मान्य केले. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. करुणा शर्मांनी केलेले आरोपी कोर्टाकडून अंशत: मान्य केलेत. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंतत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये, असंही कोर्टाने आज सांगितलं. मुंडेंनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी आणि या खटल्याचा 25 हजारांचा खर्चही मुंडेंनी द्यावा, असेही आदेश कोर्टाने दिले.

नेमकं काय आहे प्रकरण?

करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी 2021 मध्ये. त्याआधी केवळ राजकीय वर्तुळांमध्ये आणि दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा होती. मुंबईतील एका महिलेने त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली.

काय म्हणाले होते मुंडे?

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तेव्हा लिहिलं होतं की, 'करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली. दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.

कोण आहे ही महिला?

आरोप करणारी व धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये वर्णन केलेली महिला म्हणजे करुणा शर्मा होत. करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून त्या मुंबईत राहतात. मुंबईतील 'जीवनज्योत' या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित असल्याचं त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं आहे. सामाजिक कार्य करतानाचे त्यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पहायला मिळतात. करुणा शर्मा यांच्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी आपलं नाव 'करुणा धनंजय मुंडे' असं लिहिलं आहे. आपल्यावर वारंवार अत्याचार झालाय, अन्याय झालाय, असं करुणा शर्मा यांनी वारंवार सांगितलंय. त्यानंतर त्या पत्नी म्हणून हक्क मिळविण्यासाठी कोर्टातही गेल्या होत्या. आता याच प्रकरणाच कोर्टाने हा निकाल दिल्यानंतर, हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+