धनुभाऊंच्या अडचणीत पुन्हा वाढ! कृषी विभागातील 'ती' फाईल गायब करण्यात त्यांचाच हात, नेमकं प्रकरण काय?

Dhananjay Munde file missing : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, कृषी विभागातील सुमारे २४५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित एक महत्त्वाची फाईल धनंजय मुंडे यांनी गायब केली आहे. या आरोपांना कृषी विभागाच्या उपसचिवांनीही दुजोरा दिल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

नेमका आरोप काय आहे?

अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, कृषी सचिव व्ही. राधा यांनी कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात एक अहवाल तयार करून तो तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना सादर केला होता. या अहवालात कृषी साहित्य खरेदीप्रकरणातील गैरव्यवहारांचा उल्लेख होता. मात्र, हा अहवाल मंत्र्यांच्या कार्यालयातून परत आलाच नाही.

लोकायुक्तांपुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दमानिया यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी प्रतिभा पाटील नावाच्या उपसचिवांनी लोकायुक्तांसमोर सांगितले की, "ही फाईल मंत्र्यांच्या कार्यालयात पाठवल्याचा जावक क्रमांक आमच्याकडे आहे, परंतु राजीनाम्यानंतरही ती फाईल परत आलेली नाही." या माहितीमुळे दमानियांच्या आरोपांना अधिक बळ मिळाले आहे.

dhananjay munde file missing anjali damania claim

लोकायुक्तांचे आदेश आणि पुढील कार्यवाही

दमानिया यांनी एक पत्रही शेअर केले आहे, जे कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी त्यांना पाठवले आहे. या पत्रात असे स्पष्ट म्हटले आहे की, "कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढीसंदर्भात तत्कालीन कृषी सचिवांनी जो अहवाल मंत्र्यांना सादर केला होता, तो अहवाल अजूनही कार्यालयात परत आलेला नाही."

या पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, हा अहवाल उपलब्ध करून देण्याबाबत तत्कालीन मंत्र्यांच्या खासगी सचिवांना विनंती करण्यात आली आहे. लोकायुक्तांनी आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

धनंजय मुंडेंच्या पुन्हा अडचणी वाढल्या!

यापूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनीही याच प्रकरणात २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता, तर दमानिया यांनी 245 कोटींचा आरोप केला होता. जरी धनंजय मुंडेंना कृषी साहित्य खरेदीप्रकरणी हायकोर्टातून दिलासा मिळाला असला, तरी दमानियांनी त्यांना 'क्लीन चिट' मिळाली नसल्याचे म्हटले होते. आता या नवीन आरोपामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लोकायुक्तांच्या चौकशीत सत्य काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+