मोठी बातमी : कापूस-सोयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टर 5 हजारांचे अनुदान!वाचा कोण कोण शेतकरी होणार पात्र
मुंबई - सोयाबीन-कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजारांचे अनुदान मिळणार आहे. हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी मात्र ई-पीक फेरा नोंदणी आवश्यक असून त्यानंतर या अनुदानासाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत. राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून हे अनुदान दिले जाणार आहे.
हे अनुदान मिळवण्यासाठी काही पात्रता आवश्यक असून त्या पूर्ण कराव्या लागणर आहेत. तसेच आधारकार्ड लिंकिंग आणि संमतीपत्राचीही आवश्यकता आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?
सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
आर्थिक झळ कमी करणार
2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
ही रक्कम सोयाबीन- कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी.
यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक नाहरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करता येईल असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications