2 महिन्यांपासून अलिप्त असलेले धनंजय मुंडे दिसले सार्वजनिक कार्यक्रमात; बहीण पंकजांशी साधला संवाद!

Dhananjay Munde and Pankaja Munde meet In Parali : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज परळी वैद्यनाथ येथील तहसील कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परळीतील न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ सोहळा पार पडला. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील आल्या होत्या. यावेळी बहीण भाऊ यांनी संवाद देखील साधला. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. बऱ्याच दिवसानंतर बहीण भाऊ एकत्र आल्याने त्यांच्या समर्थकांना हे चित्र आनंद देणारे राहिले.

Dhananjay Munde and Pankaja Munde

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर आरोप अन् त्यास झालेली अटक. त्यानंतर कराड व धनंजय मुंडे यांच्यात असलेले संबंधाचा मुद्दा धरुन विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. अखेर धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर मुंडे यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे टाळले. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ते अलिप्त होते. परंतु, मधल्या काळात त्यांची प्रकृतीचा देखील विषय समोर आला होता. परंतु, आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ते पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या हस्ते परळी तहसिलमध्ये ध्वजारोहन सोहळा पार पडला. त्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण भावांची भेट देखील झाली.

बहीण-भावाने मारल्या मनमोकळ्या गप्ता?

परळीतील कार्यक्रमात झालेल्या भेटीदरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांत मनमोकळा संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. मागील काही महिन्यांपासून बेल्स पाल्सी या आजाराने ग्रस्त असलेल्या धनंजय यांच्या प्रकृतीची पंकजा मुंडेंनी विचारपूस केली. तर काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला. यावेळी मुंडे बहीण-भावात राज्यातील राजकीय घडामोडींबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

Take a Poll

काय म्हणाले धनंजय मुंडे?

महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर परळीत ध्वजारोहण केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ तहसील कार्यालयात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थित नागरिक, पदाधिकारी, अधिकारी - कर्मचारी आदींना महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या सर्व महात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

2 महिन्यांपासून राजकीय कार्यक्रमांपासून अलिप्त!

धनंजय मुंडे हे मागील दोन महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत नव्हते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दोनदा बीडच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात धनंजय मुंडे दिसले नाहीत.

तसेच काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला जाण्याचंही धनंजय मुंडे यांनी शेवटच्या क्षणी रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर आज मुंडे यांची परळीतील दोन कार्यक्रमांमधील उपस्थितीत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+