Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात; 17 लाख घेतले अन् पिस्तूल रोखलं; रंजना नागपूरकरांच्या आरोपांनी खळबळ!

Dhananjay Munde latest news : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुतोवाच केल्यानंतर, आता रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

Dhananjay Munde latest news

काय आहेत रंजना नागपूरकर यांचे गंभीर आरोप?

रंजना नागपूरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे, कैलास फड आणि निखिल फड यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या आरोपांमधील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

नोकरीसाठी पैशांची मागणी : पतीला पुन्हा नोकरीत रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पैशांची मागणी केली होती. त्यानुसार नागपूरकर यांनी 17 लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे.

परळीतील निवासस्थानी भेट : "मी स्वतः परळीतील त्यांच्या घरी गेले होते, तेव्हा धनंजय मुंडे तिथे हजर होते. त्यांनी मला आश्वासन दिले होते की तुमचे काम लगेच होईल," असे नागपूरकर यांनी म्हटले.

पिस्तूल रोखून धमकी : पैसे देऊनही काम झाले नाही आणि पतीच्या निधनानंतर जेव्हा नागपूरकर पैसे परत मागण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांना धक्कादायक अनुभव आला.

त्यांच्या दाव्यानुसार, "धनंजय मुंडे यांच्यासमोरच मला पिस्तूल लावण्यात आले आणि पुन्हा आलीस तर तुला गाडून टाकू, कोणाला पत्ताही लागणार नाही," अशी धमकी देण्यात आली.

"धनंजय मुंडे, निखिल फड आणि कैलास फड तिथे हजर होते. त्यांच्या समोरच माझ्या गळ्याला बंदूक लावून मला धमकावण्यात आले, त्यामुळे मी तिथे जाणे बंद केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुंडे समर्थकांचे प्रत्युत्तर : "नावाचा गैरवापर करून दुकान चालवू नका"

या गंभीर आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवाडे यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नाईकवाडे यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन अनेक लोक आपले 'दुकान' चालवत आहेत, विनाकारण साहेबांना बदनाम करू नका. रंजना नागपूरकर यांनी पैसे दिले असतील, तर ते धनंजय मुंडे यांना दिलेले नाहीत. त्यांनी बीडला येऊन समोरासमोर सत्यता पडताळून पाहावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

राजकीय पडसाद आणि गुंतागुंत

मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा उल्लेख केल्याने याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वीही वैयक्तिक आणि राजकीय स्वरूपाचे आरोप झाले आहेत, मात्र "पिस्तूल रोखल्याचा" हा ताजा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+