पहिल्या यादीत नाव न आल्याने देवयानी फरांदे आक्रमक; थेट सागर बंगला गाठला, जोरदार शक्तीप्रदर्शन

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यातच भाजपने रविवारी पहिली उमेदवारांची 99 जणांची यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली. परंतु, नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने त्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठून जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यामुळे नाशिकमधील महायुतीत वाद असल्याचे देखील बोलले जात आहे.

भाजपने रविवारी जाहीर केलेल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांचा या यादीत समावेश नव्हता. यानंतर आता देवयानी फरांदे 24 नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या.

Devyani Farande

नाशिकच्या या 4 आमदारांना पुन्हा संधी

भाजपच्या पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, बागलाणमधून दिलीप बोरसे, चांदवडमधून डॉ. राहुल आहेर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे मात्र वेटिंगवर आहेत. देवयानी फरांदे यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

म्हणून सागर बंगल्यावर प्रदर्शन

यादी जाहीर होऊन काही तास होत नाही तोच आता देवयानी फरांदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. 24 नगरसेवकांसोबत देवयानी फरांदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. फरांदे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून भाजपची दुसरी यादी येण्यापूर्वी देवयानी फरांदे यांच्याकडून आपले तिकीट फिक्स करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि देवयानी फरांदे यांच्यात नेमकी काय चर्चा होते, फरांदे यांना काय आश्वासन दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+