Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फडणवीसांनी झापले अभिमन्यू पवारांना: 'लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावे लागेल!'

Devendra Fadnavis Warns Abhimanyu Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या 'लाडकी बहीण योजना' या योजनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असते. ही योजना सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महिला कल्याणाचा आणि राजकीय फायद्याचा केंद्रबिंदू ठरली आहे.

मात्र, मंगळवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात याच योजनेच्या संदर्भावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे संतप्त झालेले दिसले आणि त्यांनी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना सर्वांदेखत खडेबोल सुनावले.

Devendra Fadnavis Warns Abhimanyu Pawar

अवैध दारूविक्रीवरून 'लाडकी बहीण'चा उल्लेख

झाले असे की, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अवैध दारूविक्रीचा गंभीर आणि ज्वलंत प्रश्न सभागृहात मांडला. हा मुद्दा मांडताना त्यांनी 'लाडकी बहीण' योजनेचा संदर्भ दिला.

अभिमन्यू पवार पोटतिडकीने काय म्हणाले?

"लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू ही आहे. आमच्या महिला भगिनी आम्हाला अवैध दारूविक्रीबाबत विचारणा करतात. आपल्या लाडक्या बहिणींचं हे दु:ख आहे. त्यामुळे याबाबत सुधारणा होण्याची नितांत आवश्यकता आहे."

पवार यांनी पुढे सांगितले की, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वी बैठक घेतली होती आणि गृह विभाग तसेच अन्न औषध प्रशासनाला निर्देश दिले होते, पण त्यानंतरही कार्यवाही झालेली नाही.

फडणवीसांचा संताप आणि कडक इशारा

प्रत्येक गोष्टीत 'लाडकी बहीण' योजनेचा संबंध जोडला जात असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले तेव्हा ते काहीसे चिडलेले दिसले. त्यांनी थेट अभिमन्यू पवारांना कठोर शब्दांत कान टोचले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका. अन्यथा घरी बसावं लागेल." मुख्यमंत्र्यांनी यावेळी योजनेबाबत सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. "लाडक्या बहिणींचे पैसे सुरु राहतील, ही योजना बंद होणार नाही. त्या योजनेची तुलना दुसऱ्या योजनेशी करता येत नाही, हे लक्षात ठेवा."

तसेच, अवैध दारूविक्रीच्या मूळ प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आश्वासन दिले की, विधानसभा अध्यक्षांनी दिलेले निर्देश आणि त्यांची अंमलबजावणी झाली नसेल, तर ती आता तातडीने केली जाईल.

राजकीय वर्तुळात चर्चा!

अभिमन्यू पवार हे फडणवीस यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक होते. त्यामुळे दोघांमधील वैयक्तिक संबंध चांगले असतानाही, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सर्वांदेखत दिलेला हा कडक इशारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

या घटनेतून फडणवीस यांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे की, 'लाडकी बहीण' ही योजना सरकारच्या दृष्टीने किती संवेदनशील आणि महत्त्वाची आहे, आणि कोणत्याही प्रश्नासाठी तिचा संदर्भ अनावश्यकपणे वापरला जाऊ नये.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+