उद्धव ठाकरे हे 'सीएम'पदाचा चेहरा नसणार, शरद पवारांच्या डोक्यात वेगळचं शिजतंय; फडणवीसांचा दावा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray CM post : पवार साहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचं, हे जवळजवळ शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

एका वृ्तवाहिणीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे मी सांगू शकतो. पण शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहे, हे सांगण तसं कठीण आहे, असा दावा देखील त्यांनी केला.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray

फडणवीस म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये पाहता उद्धव ठाकरे हा मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसावा, असे मला वाटते.

सोनीया गांधींनी सोबत फोटोही काढला नाही

उद्धव ठाकरे मध्यंतरी तीन दिवस दिल्लीला गेले होते.मुख्यमंत्रीपदासाठी मविआने त्यांचा चेहरा पुढे करावा, हा त्यांचा प्रयत्न होता. एरवी आम्ही दिल्लीत गेलो की, ठाकरे आमच्यावर किती टीका करतात. किंबहुना आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. पण उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही. सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढून दिला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पवारांच्या डोक्यात तीन चार चेहरे वेगळेच

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मनात होतं की, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा चेहरा समोर ठेवून महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी. पण शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाहीत. पवार यांच्या डोक्यात जे तीन चार चेहरे आहेत. त्यात मात्र उद्धव ठाकरे नाहीत, असा दावा देखील फडणवीस यांनी केला.

अजित दादांसोबत राजकीय युती, नॅचरल नाही

देवेंद्र फडणवीस एका वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात अजित पवार यांच्यासोबत केलेल्या युतीबाबत देखील बोलले. ते म्हणाले की, अजित पवार यांच्याशी केलेली युती नॅचरल युती नव्हती. ती राजकीय युती होती. आजही आमची आणि अजितदादांची युती राजकीय आहे. कदाचित या निवडणुकीत ती थोडी सेटल झाली. पुढील काही निवडणुकांमध्ये आणखी सेटल होईल. पुढील 5-10 वर्ष गेले तर कदाचित त्यांच्यासोबतची युतीही नॅचरल होईल, असा दावा देखील त्यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+