सडेतोड..! फडणवीसांनीही दाखवली शरद पवारांना आकडेवारी; ते ट्विट आलं चर्चेत

काँग्रेसला विधानसभेत 80 लाख मतं आहेत. तरीही त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. त्याउलट शिंदे गटाला विधानसभेत फक्त 79 लाख मतं मिळाली, तरी त्यांचे 57 आमदार निवडून आले. असं सांगत शरद पवारांनी खळबळ उडवून दिली. त्यांनी हे आकडे दाखवल्यानंतर एकच चर्चा सुरु झाल्या. आता याच चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis

काय आहे फडणवीसांचं ट्विट?

'श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.'

काय म्हणाले होते शरद पवार?

कोल्हापूरमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते की, आम्ही विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी काढली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 लाख मतं पडली तरी त्यांच्या 16 च जागा आल्या आणि शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मतं पडली. काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मत पडूनही त्यांच्या 57 जागा आल्या. अजित पवार गटाला 58 लाख मतं पडली तरी त्यांच्या 41 जागा आल्या आणि आम्हाला 72 लाख मत पडून आमच्या केवळ दहा जागा आल्या. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+