गणेशोत्सवानंतर खडसेंचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश?, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

Devendra Fadnavis on Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतलेला असेल तो आम्हाला मान्यच आहे, गणेशोत्सवानंतर त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता खडसेंचा भाजप प्रवेश लवकरच जाहीर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलताना केले. त्यावर माध्यमांनी फडणवीस यांना विचारले असता त्यांनी पक्षप्रवेशाबाबतचे संकेत दिले आहेत.

Devendra Fadnavis

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. भाजपने 2014 पासून राज्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिली. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये वादाला तोंड फुटले. त्यानंतर खडसे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांची साथ धरली व फडणवीसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप देखील केले होते. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खडसे पुन्हा भाजपमध्ये गेले. परंतु, त्यांचा पक्षप्रवेश जाहीर झालेला नसल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

मी भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर फुली मारुन टाकली आहे. इतके दिवस मला बाहेर राहणं, मी प्रवेश घेतो असं कधी म्हटले नव्हते. मला प्रवेश घ्या, असं सांगण्यात आलं, त्यामुळे मी पुन्हा भाजपमध्ये गेलो. मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन मी भाजपमध्ये गेले. माझ्यासारख्या माणूस ज्याने 40 वर्षे भाजपचं काम केलं, इतकी वर्षे काम करुन मी बहुजनांना भाजपशी जोडलं, महाराष्ट्र पिंजून काढला अनेकदा, चेष्टा सहन केली. इतकं सगळं केल्यानंतर भाजपमध्ये मला प्रवेश द्या, ही विनंती करणं माझ्यादृष्टीने अपमानास्पद आहे, असे एकनाथ खडसे काल एका वृत्तवाहिणीशी बोलताना म्हणाले होते.

फडणवीसांनी खडसेंबाबत काय संकेत दिले?

एकनाथ खडसे यांच्या विधानानंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याबाबत विधान केले. ते म्हणाले की, एकनाथ खडसे माध्यमांशी बोलताना काय बोलले याबाबत मला माहिती नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे.

त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजप एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी आयोजित करणार, हे पाहावे लागेल. तसेच एकनाथ खडसे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारणार का, हेदेखील बघावे लागेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+