फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची महिलेकडून तोडफोड, अंधारे म्हणाल्या- जर गृहमंत्रीच सुरक्षित..!
मंत्रालयात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड केली आहे. अज्ञात महिलेने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर या महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात जाऊन तिथे तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर ती महिला तेथून निघून गेली.
ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत युद्धपातळीवर त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

एक अज्ञात महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर केली आणि त्याठिकाणी तोडफोड केली. या महिलेने कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली आणि त्यानंतर ती तिथून निघून गेली.
विरोधकांचा निशाणा
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत एक ट्विट करत मंत्रालयातील सुरक्षेबाबत सवाल केला आहे. "देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची बातमी येतेय. गृहमंत्र्यांच्या सुरक्षे हा अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे. जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकिबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी.." असं सुषमा अंधारेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गृहमंत्री @Dev_Fadnavisसाहेबांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची बातमी येतेय. गृहमंत्र्यांच्या सुरक्षे हा अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे.
— SushmaTai Andhare (@andharesushama) September 27, 2024
जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकिबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी.. @PTI_News @ShivsenaUBTComm
सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत पोलीस तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील, असे सांगितले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, "सगळ्या विधायक मार्गांनी आपण गोष्टी केल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीस लोकाभिमुख नेता आहे, त्यांच्याकडे लोकशाही पद्धतीने मागण्या मांडल्या पाहिजेत, असे म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications