शपथविधीनंतरCM फडणवीसांची पहिली प्रेस; म्हणाले-आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध, शिंदे नाराजच नव्हते
Devendra Fadnavis Government 2024 First Cabinet Meeting : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे तीन्ही नेते मंत्रालयात दाखल झाले आहेत. मंत्रालयातील छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेस अभिवादन केल्यानंतर या तिघांच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे काही मागील अडीच वर्षाच्या काळात काम झाली ते वेगवान होती. कोणतीही योजना बंद होणार नाही. आता आम्ही वचननाम्यात जे सांगितले आहे ते पूर्ण करण्यासाठी काम करणार आहोत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलाचे राजकारण करायचे नाही पण बदल दाखवायचे राजकारण करायचे आहे. विरोधकांची संख्या कमी आहे, पण त्यांचा आवाज संख्येवर दाबला जाणार नाही. जनतेची देखील अपेक्षा आहे की, सरकारचे काम स्थिर चालले पाहिजे.
लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे, ती 2100 रुपये देणार आहोत. काही तक्रारी आल्या की निकषाबाहेर योजनेचा लाभ झाला असेल तर तक्रारी आल्या तर त्या दुरुस्त केल्या जातील. सरसकट योजना बंद केली जाणार नाही. त्यामुळे ही चिंता दूर केली जावी.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर अधिवेनशापूर्वी आमचे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. ७ ते ९ या दरम्यान अध्यक्षाची निवड केली जाईल, शाश्वत विकास हाच त्यामागील उद्देश आहे. त्यामुळे आम्ही काम करत आहोत.
सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील
महाराष्ट्र आता थांबणार नाही, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आणि त्या गतीनेच महाराष्ट्र पुढे जाईल. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील असा मी विश्वास व्यक्त करत आहे. रोल जरी आता बदलले असले तरी समन्वय तोच राहणार आहे. आता आमची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली, तेव्हा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आता टेस्ट मॅच आहे त्यामुळे योग्य निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचे आहेत. नदी जोड प्रकल्प असेल किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आमचा प्रयत्न हा असणार आहे की आमच्या वचननाम्यात जी काही वचन आम्ही दिली आहेत ते सर्व आम्ही पूर्ण करणार.
आमचे सरकार हे सर्वांना सोबत घेऊन जाणार
महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो आमचे सरकार हे सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत. संकटे अनेक येत असतात मात्र त्या संकटातून वाट काढत आपण प्रगती करणार आहोत आणि जनतेला आश्वासित करतो की पारदर्शीपणे हे सरकार काम करेल. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधकांची संख्या कमी आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या संख्येनुसार आम्ही त्यांचा सन्मान करणार नाही असे नाही. आम्ही त्यांच्या संख्येवर नाही तर त्यांच्या मुद्याचा सन्मान करू.
नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करू
विधीमंडळाचे विशेष अधिवेशन 7, 8 आणि 9 डिसेंबर बोलावणार आहे. त्याचदरम्यान 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करणार आहोत. त्यासाठी राज्यपालांकडे शिफारस पाठवली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जमिनी बळकाऊन विकास करण्याची मानसिकता नाही
शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे. सगळे शेतकरी भूसंपादन करण्यासाठी सांगतात. सांगली जिल्ह्यातील काही भागात त्याला समर्थन आहे. पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो, तिथे मात्र, मोठ्या प्रमाणात विरोधात आहे. आम्ही समृद्धी महामार्ग लोकांचा विरोध पत्कारून केला नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला ज्या भागापर्यंत विरोध नाही, तिथपर्यंतची अलायमेंट फायनल करायची आणि पुढची अलायमेंट सगळ्यांशी चर्चा काही पर्याय काढता येतो का, याचा विचार करू. कारण शेतकऱ्यांना नाराज करून, त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आमची मानसिकता नाही.
एकनाथ शिंदे हे अजिबात नाराज नव्हते
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे अजिबात नाराज नव्हते. मात्र, ते नाराज असल्याच्या बातम्या जरुर चालल्या. एकदा तर गिरीश महाजन हे सहज भेटायला गेले तर ते त्यांना समजावयला गेले असे म्हटले गेले. मुळात एकनाथ शिंदे यांना मी विनंती केली की तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हावे.
मंत्रालयाच्या दालनातील पाट्या बदलल्या
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दालनातील पाट्या बदलण्यात आल्या आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आलेली आहे.

लाडक्या बहिणींनी केले स्वागत
मंत्रालयाच्या इमारतीत दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिदे, अजित पवार यांचे त्या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या लाडक्या बहिणींनी औक्षण करत स्वागत केले. तसेच कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष साजरा केला.
पहिली सही वैद्यकीय मदतीसाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिली सही यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील एका बोन मॉरो ट्रान्सप्लाट रुग्णासाठी त्यांनी पाच लाखांची मदत केली आहे.
7 डिसेंबरला विशेष अधिवेशनाचे आयोजन
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 7 डिसेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
-
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद -
ऑनलाइन फसवणुकीला बसणार लगाम! मेटाची 'अँटी-स्कॅम' ढाल; WhatsApp, FB व मेसेंजर आता सुरक्षित! -
LPG cylinder shortage : भारतात एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा! सरकारचे मोठे आदेश, कुठे काय स्थिती जाणून









Click it and Unblock the Notifications