देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री! उद्यापासून सांभाळणार राज्याची धुरा, विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड

Devendra Fadnavis : भाजपचे दिग्गज नेते आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांची भाजपतर्फे विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने मुख्यमंत्री तेच होणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

आज भाजपची कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, गिरीश महाजन अतूल सावे, राहूल नार्वेकर, विनोद तावडे आदींची उपस्थिती होती.

Devendra Fadnavis

उद्या कोण कोण शपथ घेणार..?

सूत्रांकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या गुरुवारी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन जण शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राचा'देवाभाऊ' होणार मुख्यमंत्री

भाजपचे दिग्गज धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. तूर्त मंत्रिपद कुणाला किती मिळणार हे ठरलेले आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांकडून आपपाल्या नेत्यांची नावे मंत्रि‍पदासाठी निश्चित केली जाणार आहेत.

आज करणार सत्ता स्थापनेचा दावा

महायुतीकडून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपालांकडे रितसर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. त्यामुळे आज महायुतीतर्फे भाजप आणि उर्वरित नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची आज राजभवनात भेट घेतील. ही भेट दुपारी तीन ते साडेतीन दरम्यान घेण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटून सत्ता स्थापनेसंदर्भात तसेच महायुतीतील अन्य पक्षांच्या समर्थनाचे पत्रही दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

https://marathi.oneindia.com/maharashtra/devendra-fadnavis-elected-as-group-leader-of-legislative-assembly-will-be-sworn-in-the-cm-tomorrow-013025.html

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा येणार विरोधकांनाही निमंत्रण

महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अनेक राज्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. उद्याच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह केंद्रातील बडे मंत्री, भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यासह राज्यातील महत्वाच्या व्यक्तींसह महायुतीचे नेते तसेच विरोधकांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे बोलले जात आहेत. या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+