देवेंद्र फडणवीस- आण्णा हजारेंच्या भेटीने भुवया उंचावल्या; स्वतः हजारेंनी केलेले स्वागतही आले चर्चेत
ज्येष्ठ गांधीवादी नेते आण्णा हजारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. या दोघांनी हस्तांदोलन करुन एकमेकांशी चर्चा केली. सध्या याच हजारे-फडणवीस भेटीच राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात आंदोलन करणारे आण्णा हजारे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शांत आहेत. मात्र आता पुन्हा हजारे-फडणवीस भेटीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

फडणवीस अहिल्यानगरमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अहिल्यानगरमध्ये आले. आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला ते उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे हेलिपॅडवर आगमण झाले, त्यावेळी तिथे भाजप नेते पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर फडणवीसांचा हा पहिलाच अहिल्यानगर दौरा आहे.
अण्णा हजारेही उपस्थित
याच विवाह सोहळ्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिपॅडवर आगमन झाल्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत अण्णा हजारेही फडणवीसांच्या स्वागतासाठी दिसले. फडणवीसांनी हेलिकाँप्टरमधून उतरल्याबरोबर हजारे यांचे स्वागत स्विकारले. त्यांच्याशी आदबीने चौकशी केली. फडणवीस-हजारे यांची हिच भेट सध्या चर्चेत आली आहे.
हजारे सध्या शांत
देशात काँग्रेसची सत्ता असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जंतर- मंतरवर मोठं आंदोलन केले होतं. या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेवर आलं. अण्णा हजारे यांनी या आंदोलनापूर्वी देखील अनेक आंदोलनं केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे ते फारसे चर्चेत नव्हते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला अहिल्यानगरमध्ये उपस्थित असल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अण्णांनी पुष्पगुच्छ देऊन फडणवीस यांचं स्वागत केलं.












Click it and Unblock the Notifications