Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उज्ज्वल निकम यांनी सादर केला 'हा' नवा पुरावा; कराडने केला 'हा' अर्ज, कोर्टात काय-काय घडलं, वाचा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज (10 एप्रिल) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्रे मागितली. ती सर्व कागदपत्रे सरकारी वकीलांनी दिली. फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तेही आरोपींच्या वकीलांना देण्यात येणार आहेत. या सगळ्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नवा पुरावाही न्यायालयाला दिला. न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असल्याचे सांगितले.

Deshmukh murder case hearing

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. कोर्टात काय झाले हे त्यांनी सांगितले. अॅड. निकम म्हणाले, न्यायालयात आरोपींच्या वकीलांनी काही कागदपत्रे मागितली होती. ती सर्व आज त्यांना दिली. याशिवाय वाल्मिक कराडने काही कागदपत्रांची मागणी केली होती. ती सिलबंद असल्याने सील उघडल्यानंतर ती कागदपत्रेही आरोपींच्या वकिलांना दिली जाणार आहेत, असे निकम यांनी सांगितले.

सादर केला मोठा पुरावा

आजच्या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ न्यायालयात सादर केला. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आरोपींनीची त्यांच्या मोबाईलमध्ये रेकाँर्ड केला होता. मात्र तो आता मिळविण्यात आला आहे. हा व्हिडीओ सादर करताना अॅड. निकम यांनी एक महत्त्वाची मागणी न्यायालयाला केली. हा व्हिडीओ बाहेर समाजमाध्यमांवर येऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. मात्र त्याचा समाजमाध्यमांवर विपरीत परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाल्मिक कराडने केली मागणी

वाल्मिक कराडने या प्रकरणात आपला सहभाग नाही, असा अर्ज न्यायालयाकडे सादर केला. डिस्चार्जमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत. या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे, असंही उज्वल निकम यांनी सांगितले.

न्यायालयात काय काय घडलं?

- आज तिसरी सुनावणी होती. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.

- सरकार पक्षाच्या वतीने विशेष वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली.

- आरोपींच्या वतीने ॲड विकास खाडे यांनी बाजू मांडली.

- सरकारी पक्षाच्या वतीने नवे पुरावे न्यायालयात जमा करण्यात आले.

- या मुद्देमालामध्ये काही सीलबंद पॉकेट्स होते.

- सीलबंद पॉकेटमध्ये 164 ब चे जवाब पंचनामे यासह इतर बाबींचा समावेश

- मुद्देमालामध्ये आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले शस्त्र तसेच इतर साहित्यांचा समावेश होता.

- या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचे डिस्चार्ज एप्लीकेशन न्यायालयात दाखल केले.

- या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूर कारागृहात आहे. त्याला बीडच्या कारागृहात हलवण्यात यावे यासाठी विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी अर्ज दाखल केला.

- पुढील सुनावणी २४ तारखेला होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+