1 कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये टाकले! लवकरच आणखी 1 कोटी महिलांनाही रक्कम मिळणार - फडणवीस
Ladki Behin Yojana satara : लाडकी बहिण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये टाकले असून लवकरच आणखी 1 कोटी महिलांनाही रक्कम मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत कार्यक्रमात सातारा इथं ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आदींची उपस्थिती होती.

ज्याच्यामागे ताई त्याला कुणी मारु शकत नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्याच्यामागे ताई त्याला कुणी मारु शकत नाही. एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्या पाठीशी कवचकुंडलं आलाडकी बहिण योजनेच्याहेत. आता या बहिणींची सेवा करण्यासाठी आता कुणीही थांबवू शकत नाही. या महाराष्ट्रा आणि देशात आमच्या महिलाकेंद्रीत अशा प्रकारच्या योजना या सातत्याने सुरु केल्या, त्या देशाच्या पंतप्रधानांच्या सांगण्यावरुच. महिलांना सक्षम करा असे ते म्हणाले आहे.
दर महिन्याला ओवळणी मिळणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेंच्या नैतृत्वात महिला धोरणांची सुरुवात आपण केली आहे. एसटी अर्ध्या तिकीटात केली. त्याला महिलांनी भरभराट सुरु होत आहे. अर्ध्या तिकीटामुळे महिला पतीला घरी बसवून त्या महत्वाची कामे करत आहेत. त्यामुळे आता त्या धाडसीही होत आहेत. उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे भाऊ ओवाळणी टाकतीलच पण हे तुमचे राज्यकर्ते भाऊ दरमहिन्याला तुम्हाला ओवाळणी टाकणार आहे. यात खंड पडणार नाही.
विरोधक सावत्र भाऊ..दिशाभूल करत आहेत
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, काही सावत्र भाऊही आहेत, जे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी कोर्टात जाऊन ही योजना थांबवण्याचा प्रयत्न केला. कोर्टानं सांगितलं की, ही योजना आम्ही थांबवणार नाही. लाडक्या बहिणींची योजना सुरुच राहील.
एक कोटी महिलांच्या खात्यात रक्कम टाकली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करुन पाहिले पण आम्हाला बहिणींचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे आम्हाला कुणी थांबवू शकत नाही. आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही काल एक कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पोहचले आहेत.
उद्या सत्तेत आले तर विरोधक योजना बंद करतील
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याच बहिणींना आम्ही वंचित राहू देणार नाही. सावत्र भावांनी राज्य सरकारकडे निधीच नाही असं सांगितलं पण आम्ही त्यांना बजेट दाखवलं. या बजेटमध्ये पुर्ण वर्षभराचे पैसे ठेवले आहेत. त्यापुढच्या वर्षातही असेच करु. आमच्या लाडक्या बहिणींसाठी हे पैसे आहे. उद्या चुकीने हे सत्तेत आले तर ते लाडक्या बहिणींचे अनुदान थांबवतील.












Click it and Unblock the Notifications