Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांची विधानसभेत शेरोशायरी, विरोधकांना काढले चिमटे

मुंबई : राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेत सध्या सत्ताधारी व विरोधकांत जोरदार बॅटिंग सुरु आहे. राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वेगळाच मूड दिसला.

Dcm Ajit Pawar

दोन दिवसांपूर्वी व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला भावनिक साद घालणारे अजितदादा आज एकदम वेगळ्या अंदाजात दिसले. आपल्या स्टाईलने चक्क शेरोशायरी करत दादांनी सभागृह हलक-फुलकं केलं.

गेल्या आठवड्यापासून विविध मुद्द्यांवर विधानसभा आणि विधानपरिषदेत चर्चा होत आहेत. काल भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी बोलावलेल्या बसवरुन सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ही बस गुजरातवरुन का मागितली यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी बसवरुन विरोधकांना खडे बोल सुनावले. आज अधिवेशनात मात्र या विषयावर जास्त चर्चा झाली नाही. मात्र अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुन्हा शेरोशायरीचा मूड दिसला.

प्यार करोगे तो..." दादांनी धुतलं..

प्यार करोगे तो प्यार करेंगे, हात मिलाओंगे तो हात भई मिलाएंगे, गले मिलाए तो गले भी मिलाएंगे, सीतम करोगे तो सीतम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोंगे वैसे हम भी करेंगे, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अजितदादांच्या मूडला सत्ताधाऱ्यांनी चांगलीच दाद दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+