उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार! Youtubeचॅनलच्या कमेंटद्वारे जरांगेंना जीवे मारण्याची धमकी
Death threat to Manoj Jarange : उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार! अशा आशयाची धमकी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना देण्यात आली आहे. या धमकीचा खुलासा एका युट्यूब चॅनलच्या कमेंटमधून झाला आहे. या प्रकारामुळे मनोज जरांगे यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मनोज जरांगे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने एक बैठक बोलावली होती. या बैठकीत निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांशी मनोज जरांगे चर्चा केली आहे. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला होता.

युट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये धमकी!
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे. कमेंटद्वारे धमकी देणाऱ्याचे नाव मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये मनोज जरांगे यांना धमकी दिली गेली या धमकीच्या मजकुराचा स्क्रिन शाॅट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इच्छुक म्हणून येणार अन्..
कमेंटमध्ये नेमका मजकूर काय होता यासंदर्भात खुलासा झाला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशा आशयाची ही धमकी असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन ही धमकी दिली जात असल्याचेही समोर आले आहे.त्यामळे, मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या उमेदवारांची किंवा बैठकीदरम्यान आतमध्ये जाणाऱ्या सर्वांची आता तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगेंचे इच्छुकांना आवाहन
दरम्यान आजच अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे हे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांशी चर्चा करत आहेत. या बैठकीप्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "उमेदवारीचा हट्ट धरणाऱ्या इच्छुकांना समजावणार आणि मी माझे मतच सांगणार आहे, त्यांच्यावर नाराज होणार नाही, त्यांच्यावर रुसणारही नाही. मात्र समजून सांगायचे प्रयत्न मी करणार आहे."
मराठा समाजासाठी सर्वांचे योगदान आहे. समाजाचेही आंदोलनात मोठे योगदान आहे. त्यांना सुखी ठेवायचे असेल तर काही दिवस रात्रंदिवस जागावे लागेल. कष्ट जर केले तर पुढच्या पाच वर्षांत गोरगरीब जनता मग ती कोणत्याही जातीची असो ओबीसी, मराठा, शेतकरी असो सुखी राहतील.
गोरगरीब इच्छुकांच्या भरवशावर आहे. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी हट्ट करु नका. कारण इच्छुकांच्या हट्टापायी गोरगरीब जनतेचे नुकसान होणार आहे. जर एकाच मतदारसंघात जास्त इच्छुकांनी हट्ट धरला तर उपयोग नाही. एक माणूस उभा राहीला तर त्याला बळ मिळायला हवे असेही मनोज जरांगे म्हणाले.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications