Tanisha Bhise Death : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादायचा अहवाल सादर, डॉ. केळकरही तितकेच दोषी
Tanisha Bhise Death Case Update : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा ठपका शासनाच्या पहिल्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालातून देखील या मृत्यू प्रकरणाबाबत मोठी अपडेट आली आहे. आता गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर यांनी राहु-केतुवर फोडलं होतं.
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. 50 पानी अहवालात बऱ्याच गोष्टी आता उघडकीस आल्या आहेत.

तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, त्यादिवशी 7 कोटी 47 लाख रूपये रक्कम मंगेशकर रूग्णालयाकडे शिल्लक होती. जी निर्धण किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींच्या उपचारासाठी आहे. धर्मादाय आयुक्तालयाची पाच जणांची समिती होती. हा अहवाल दोन दिवस आणि एक रात्र असं सलग बसून बनवण्यात आलाय. काल सकाळी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालात डॉ. केळकर जे डीन आणि संचालक आहेत, तेही दोषी आढळून आलेत. त्यांचा जबाब देखील धर्मादाय आयुक्तालयाने नोंद केला आहे.
धर्मादाय आयुक्तालयाच्या चौकशीत काय आढळलं?
तनिषा भिसे यांच्या पतीचं देखील स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलंय. डॉ. घैसास हे या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत. कारण त्यांनी हे डिपॉझिट मागितलं होतं. ते राहु-केतु वैगेरे. त्यांना काय सुचलं, अशी भूमिका डॉ. केळकर यांची होती. ती देखील धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात जशीच्या तशी मांडण्यात आली. परंतु डॉ. केळकरांच्या संमतीशिवाय हे झालेलं नाही. डॉ. केळकर आणि संपूर्ण मंगेशकर रूग्णालय व्यवस्थापन हेच याला जबाबदार आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष यामध्ये काढण्यात आला आहे.
रुग्णालयासंदर्भात काही शिफारशींचा केला समावेश
रूग्णालयासंदर्भात काय-काय करायला हवं, यासंदर्भात देखील धर्मादाय आयुक्तांनी काही शिफारशी मांडल्या आहेत. यामध्ये मंगेशकर रूग्णालयाचं जे नाव आहे. त्यात धर्मादाय शब्द असणे, आधीपासून गरजेचे होते. तो शब्द असेल. तर केवळ पुणेच नाही तर राज्यातील सर्व चॅरिटेबल रूग्णालयांच्या नावात धर्मादाय शब्द येणार आहे. डॉ. केळकर हे डॉ. घैसास यांच्याइतकेच या घटनेला जबाबदार आहेत, असा ठपका या अहवालात करण्यात आला आहे.
नेमकं संपूर्ण प्रकरण कसं घडलं होतं?
प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही.
परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही.












Click it and Unblock the Notifications