महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक सर्वात जास्त, गुजरात, कर्नाटक पिछाडीवर, फडणवीसांनी आकडेवारीच दाखवली
मुंबई : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने एक नवा विक्रम केला आहे. मागील दोन वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत गुजरातलाही मागे टाकले आहे. विरोधकांकडून राज्यात येणारे प्रकल्प पर इतर राज्यात नेल्याचे आरोप अनेकवेळा करण्यात आले.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परकीय गुंतवणुकीची आकडेवारीच मांडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, आम्ही अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करून दाखवू, असे सांगितले होते. आता आम्ही सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखविली आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये काय म्हणाले?
अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे, एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.असे फडणवीस यांनी सांगितले.
अभिनंदन महाराष्ट्र !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 6, 2024
अतिशय आनंदाची बातमी !!
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के
परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!
गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा… pic.twitter.com/8XT2n7e0w2
कोणत्या राज्याला किती गुंतवणूक?
फडणवीस यांनी कोणत्या राज्याला किती गुंतवणूक मिळाली याची आकडेवारीच मांडली आहे. कर्नाटक (19,059 कोटी), (10,788 कोटी), तेलंगणा (9023 कोटी), गुजरात (8508 कोटी), तामिळनाडू (8325 कोटी), हरयाणा (5818 कोटी), उत्तरप्रदेश (370 कोटी), राजस्थान (311 कोटी) इतकी गुंतवणूक या राज्यांत झाली असून या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) 2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक).
राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications