Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

... तर मी त्या क्षणीच राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा आंदोलन आणि उपोषणही केलं आहे. जरांगे पाटलाच्या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मराठा-ओबीसी आरक्षणावरुन राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून मनोज जरांगे यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

devendra fadnavis on maratha reservation

'आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामागे मी भक्कमपण उभा राहिलोय, जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना जर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे, आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण करतोय, असं वाटलं तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन, आणि मी राजकारणातून संन्यास घेईन' असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की, राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात, इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो.

शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि माझं पाठबळ आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की, मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा शिंदे साहेबांनी केले. शिंदे साहेबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, तर मी राजीनामा देईनच , पण राजकारणातून देखील संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+