Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी भेटणार ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारीखची सांगून टाकली

नाशिक : लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्टला खात्यात जमा होणार आहेत, तसेच ही योजना सुरु ठेवायची असल्यास आम्हाला निवडून द्या, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा राज्यात सुरु आहे. आज नाशिकच्या येवल्यात ही यात्रा आली असून अजित पवार यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ज्यांनी भरले आहेत, त्यांच्या खात्यांची माहिती आमच्याकडे आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना काही प्रमाणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. सध्या त्याच्यावर काम सुरु आहे. माझ्या मनात खोटं नाही, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. कालच रात्री मी, मुख्यमंत्री आम्ही सगळे चर्चा करत बसलो होतो. या बैठकीत आम्ही लाडकी बहिण योजनेबद्दल चर्चा केली. ही योजना 90 टक्के महिलांपर्यंत पोहोचली आहे.

Dcm Ajit Pawar

कालच मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आलो आहे. महायुतीचे सरकार भगिनींना भाऊबीज दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही, जुलै ऑगस्ट असे 2 महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यात 17 तारखेला जमा होतील, अशा शब्दांत अजित पवारांनी महिलांना आश्वासित केले आहे.

विरोधकांना याच दुख आहे, वेळ मारुन नेहण्याचं काम असल्याचे ते म्हणतात, मात्र आम्हाला लॉंग टर्म राजकारण करायचं आहे, मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, कोणी खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नका. ही योजना बंद करण्याकरिता सुरु केलेली नाही, ती कायमस्वरुपी चालू राहणार आहे, ही योजना चालू ठेवायची म्हटल्यावर तुम्ही आम्हाला निवडून द्यायला हवे, त्यासाठी बटण दाबलं पाहिजे ,असे आवाहनही पवार यांनी केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+