महायुतीत वादाची ठिणगी , अजित पवारांच्या ताफ्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
पुणे : आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा राज्यात सुरु आहे. या जनसन्मान यात्रेदरम्यान महायुतीत वादाला ठिणगी पडली आहे. अजित पवार जनसन्मान यात्रेनिमित्त जुन्नरमध्ये आहेत. त्या दरम्यान भाजप आणि एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी पवाराच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत.
अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे
जुन्नरमधील नारायणगाव येथे अजित पवारांची जन सन्मान यात्रा पोहोचली. त्यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.अजित पवार चोरुन चोरुन बैठका घेतात. प्रशासनाचा गैरवापर करतात. स्थानिक आमदार हा राष्ट्रवादीचा कार्यक्रम असल्याचे सांगतात.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा फोटो गायब आहे. आम्हाला कोणत्याही कार्यक्रमात विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे अजित पवारांना महायुती मान्य नसेल तर त्यांनी जाहीर करावे असं आशा बुचके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .
आमचा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलून पालकत्वाची भूमिका पाळली नाही. पालकमंत्र्याची मस्ती खपवून घेतली जाणार नाही, मी फक्त राष्ट्रवादीचा पालकमंत्री असुन महायुतीशी माझा संबंध नाही, असं अजित पवार यांनी जाहीर करावं असं आदोलकांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच अजित पवार हाय हाय, पालकमंत्री हाय अशा तुफान घोषणाबाजी आंदोलकांनी केली.












Click it and Unblock the Notifications