Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुश्रीफांनी सोडलं, अजित पवारांनी दत्ता मामांना घेरलं; कसा सुटला अखेर वाशिमच्या पालकमंत्रीपदाचा तिढा!

Washim District Guardian Minister Datta Mama Bharane : मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडल्यानंतर वाशिमचे पालकत्व कुणाला मिळणार?, याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या.

परंतु, आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या रिक्त जागेचा अखेर निकाल लावलाच. या ठिकाणी अजित पवार यांनी त्यांचे अतिशय विश्वासू तथा कॅबिनेट मंत्री दत्ता (मामा) भरणे यांची नियुक्ती केली आहे.

नवीन राजकीय खेळी खेळल्याची चर्चा

मंत्रिमंडळात भरणे मामा यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नव्हतं. आता मात्र त्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. भरणे यांना पालकमंत्री करून अजितदादांनी नवी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Datta Mama Bharne

मुश्रीफांनी पालकमंत्रीपद नाकारलं

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद पाहिजे होते. मात्र आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून कोल्हापूरची जबाबदारी मिळाली. त्यामुळे मुश्रीफ यांचा हिरमोड झाला. यानंतर मुश्रीफ यांना थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र येथे मुश्रीफ यांचं मन काही रमलं नाही.

कोल्हापूरपासून वाशिम 600 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर आहे. त्यामुळे प्रवासात खूप वेळ जातो, असे कारण पुढे करत मुश्रीफांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं होतं.

पालकमंत्रीपदावरुन महायुतीत सुरुवातीपासूनच धुसफूस

पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असतानाच कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी लपून राहिलेली नव्हती. कोल्हापूरचे पालकमंत्री शिवसेनेकडे गेलं असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

प्रजासत्ताक दिनाला आले त्यानंतर निघून गेले

26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी हसन मुश्रीफ वाशिमला पोहोचले होते. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठले होते. त्यामुळे मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा तेव्हाही राजकीय वर्तुळात रंगली होती. यानंतर त्यांनी पालकमंत्रिपद सोडले.

दत्ता भरणे यांची नवीन इनिंग सुरू

मुश्रीफांनी पालकमंत्रीपद नाकारल्याने वाशिमची जागा रिक्त झाली. या पदावर कुणाला संधी द्यायची असा प्रश्न होता. अजित पवार मंत्री दत्ता भरणे यांना वाशिमचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना या पदाचा अनुभव आहे. महायुती सरकारमध्ये त्यांना कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री केलेले नव्हते. आता वाशिमचे पालकमंत्री म्हणून त्यांची आणखी एक इनिंग सुरू झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+