Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Dasara Melava 2024 : आव्वाज कुणाचा..? कोण जमवणार रेकाँर्डब्रेक गर्दी..? आज राज्यात चार दसरा मेळावे

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं आहे. महायुती व महाविकास आघाडीचे रोज कार्यक्रम सुरु आहेत. राजकीय वातावरण तापलेलं असताना आज राज्यात चार प्रमुख पक्षांचे व संघटनांचे राजकीय मेळावे होत आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या या मेळाव्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागले असून, यापैकी कुणाचा मेळावा रेकाँर्डब्रेक गर्दी जमवतो, हे यानिमित्ताने समजणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेला व पक्षाला आपली ताकद दाखवण्याचा नामी संधी या दसरा मेळाव्यातून मिळाली आहे.

शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांकडे लक्ष

गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट वेगवेगळे झाले. दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख आहे. यावर्षीही या दोन्ही गटांचे दसरा मेळावे होणार आहेत. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाने आपला दसरा मेळावा आयोजित केला आहे. आज सायंकाळी पाच वाजता तो होईल. या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. या मेळाव्यासाठी सुमारे दीड ते दोन लाख लाख बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

dasara 2024

आझाद मैदानावर शिंदे गटाची तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही आपल्या गटाचा दसरा मेळावा घेणार आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर आयोजित केला असून तोही सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे. शिंदे गटाच्या या मेळाव्यासाठी साधारणः एक ते दीड लाख लोक बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेही आपल्या कार्यकर्त्यांत उत्साह भरुन आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेनेच्या या दोन्ही मेळाव्यात आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

मुंडेंचा भगवान भक्ती गडावर मेळावा

भगवान भक्ती गडावर दरवर्षीप्रमाणे यावेळीही मुंडे कुटुंबाचा दसरा मेळावा होणार आहे. यावर्षी या मेळाव्यात पहिल्यांदाच धनंजय मुंडे व लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. मुंडे भाऊ-बहिण पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी अकराच्या सुमारास हा मेळावा सुरु होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. मी येतोय, तुम्हीही या.. असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी सर्वांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्याला यावर्षी रेकाँर्डब्रेक गर्दी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

जरांगे पहिल्यांदाच घेणार दसरा मेळावा

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होणार आहे. बीड जवळील नारायण गडावर 900 एकर जागेत तो होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी झाली असून जवळपास 200 एकरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मनोज जरांगेंचा हा दसरा मेळावा दुपारी एक वाजता सुरु होईल, असे सांगण्यात आले आहे. या मेळाव्याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत आयोजकांनी या मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+