Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दापोलीत विकास बोलतोय..! महायुतीतील एकीमुळे वाढली आमदार योगेश कदम यांच्या विजयाची शक्यता

Dapoli Assembly Election 2024 : कांदिवलीत गटप्रमुख, मग उपशाखाप्रमुख त्यानंतर शाखाप्रमुख आणि नंतर खेडचे आमदार असा दैदीप्यमान प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी दापोलीत खऱ्या अर्थाने विकास केला, असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात. कोकणात शिवसेना ज्यांनी वाढवली त्या मोजक्या नेत्यात रामदास कदमांचे नाव घेतले जाते.

आता या मतदारसंघात त्यांच पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. तेच यावेळी महायुतीकडून उमेदवारी करत आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने संजय कदम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि महायुतीतील एकीच्या जोरावर सध्यातरी आमदार योगेश कदम यांचेच पारडे येथून जड वाटत आहे.

Dapoli Assembly Election 2024 mva Sanjay Kadam s vs Mahayuti Yogesh Kadam

दापोलीच्या विकासास चालना

दापोली मतदारसंघात आ. योगेश कदम यांनी शिवसेना शिंदे गटाची खऱ्या अर्थाने बांधणी केली. सुक्ष्म नियोजन, विकासाची दृष्टी आणि आभ्यासू प्रवृत्ती या त्रिसूत्रीच्या जोरावर योगेश कदम यांनी दापोलीचा चेहरामोहरा बदलवला. महायुती सरकारमुळेच अवघ्या अडीच वर्षात या मतदारसंघातील लोटे येथे कोकाकोलासारखी आंतरराष्ट्रीय कंपनी आली.

कोकाकोला कंपनीच्या माध्यमातून स्थानिक साडेतीन हजार तरूणांच्या हाताला काम मिळाले. विशेष म्हणजे या कंपनीत केवळ स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात आले. या कंपनीत एकाही परप्रांतीयास स्थान नसेल, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली होती. एवढ्या मोठ्या कंपनीमुळे दापोलीच्या विकासाला चालना मिळाली, हे मान्यच करावे लागेल.

आमदार कदमांचा विक्रमी विकासनिधी

विकासाचे कागदावरचे आकडे न दाखवता प्रत्यक्षात विकासपूर्ती करून दापोली विधानसभा मतदार संघात आ. योगेश कदम यांनी सुमारे दोन हजार कोटीहून अधिक रुपयांच्या निधी खेचून आणला. या विकासनिधीतून या मतदारसंघात विकासकामे झाली. काही विकासकामे सुरु आहेत. खेड, दापोली, मंडणगड आदी भागात रस्ते, वीज, पाणी व अन्य नागरी सुविधांना आ. कदम यांनी प्राधान्य देत त्या सोडविल्या. आमदार योगेश कदम यांनी आणलेला दोन हजार कोटींचा विकासनिधी हा आत्तापर्यंतचा विक्रमी निधी ठरला आहे.

दापोलीत ठाकरे गटाविरोधात नाराजी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करत केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान होण्यासाठी काँग्रेसशी सलगी करुन उद्धव ठाकरे यांनी कट्टर शिवसैनिकांना संपवण्याचे षडयंत्रच रचल्याचा आरोप, ज्येष्ठ नेते रामदास कदम व आ. कदम यांनी अनेकदा केला. ज्या शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करत शिवसेना घराघरात पोहोचवली तिच शिवसेना आता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वळचणीला जावून पडल्याचे दुःख दापोलीतील कट्टर शिवसैनिकांना आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून रोज पक्षप्रवेश होताना दिसले आहेत. याचा फायदा आ. कदम यांना येत्या निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकत्रितपणामुळे महायुतीची ताकद वाढली

दापोलीत यापूर्वी शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये गैरसमजातून वाद होते. त्याचा फटका स्थानिक निवडणुकांत महायुतीला बसला होता. मात्र दापोलीतील विकासकामांचा वेग कायम ठेवायचा असेल तर एकी दाखवावीच लागेल, हे स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांना जाणवले.

मतदारसंघात महायुती बळकट व्हावी म्हणून दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक स्वतः आ. योगेश कदम यांनी पुढाकार घेऊन घेतली. त्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी वाद मिटल्याचे जाहिर करत, भाजपचे कार्यकर्ते हे आ. योगेश कदम यांचा प्रचार करतील, असे जाहीर केले. सध्या शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे तिन्हीही एकत्रीत प्रचार करत असल्याने आ. योगेश कदम यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+