Dada Bhuse Biography : दादा भुसे यांनी घेतली मंत्रीपदाथी शपथ, वाचा त्यांची राजकीय कारकिर्द
Dada Bhuse Biography and Networth : नूतन महायुती सरकारमध्ये मालेगावचे आक्रमक तसेच कट्टर शिवसैनिक दादा भुसे यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात त्यांनी बंडखोर उमेदवार बंडूकाका बच्छाव यांचा १ लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला. या मतदारसंघात उबाठा उमेदवार अद्वय हिरे तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. तर आज झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चला तर जाणून घ्या, त्यांच्या राजकीय प्रवासाची संपूर्ण वाटचाल...!
उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव हे शहर अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात छोट्या मोठ्या दंगली वारंवार घडत असतात. 2006 साली मालेगाव येथे बॉम्बस्फोट देखील झाले होते. मालेगाव सह अशा अनेक संवेदनशील भागांवर बाळासाहेब ठाकरे यांची बारकाईने नजर होती. आणि त्यांनी अशा संवेदनशील भागात कडवट हिंदुत्ववादी तरुणांना मोठी ताकद दिली. त्यातले एक नाव म्हणजे दादाजी भुसे.

लोकप्रिय आणि शिवसैनिक
मालेगाव मध्ये दादा भुसे हे अत्यंत लोकप्रिय शिवसैनिक आहेत. साधा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता. दिघे यांच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांची मैत्री जमली. दादा भुसे यांच्यावर आनंद दिघे यांचा प्रचंड पगडा आहे. मालेगाव या मतदारसंघात दादा भुसे यांनी आक्रमक संघटन उभे केले. त्यामुळे दादा भुसे यांची मालेगाव मधील हिंदू धर्मियांत लोकप्रियता प्रचंड वाढली. रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचा थेट तळागाळात संपर्क निर्माण झाला.
सलग यश
2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग निवडणुका दादा भुसे यांनी जिंकल्या. 2014 च्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांना मंत्रीपद मिळाले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळात दादा भुसे हे राज्याचे कृषिमंत्री झाले. 2022 साली शिवसेनेत उठाव झाला आणि चाळीस आमदार तसेच आठ मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. एकनाथ शिंदे यांना समर्थ साथ दिली ती दादा भुसे यांनी. त्यांना राज्याचे बंदर विकास मंत्री म्हणून संधी देण्यात आली.
विकासाचे प्रकल्प
आपल्या राजकीय कारकिर्दीत दादा भुसे यांनी मालेगावची संवेदनशील ही ओळख बदलण्याचा कसोशीने प्रयत्न केला. शहरात विकासाचे अनेक प्रकल्प आणि योजना त्यांनी राबवल्या. मालेगाव शहरात 100 खाटांचे महिलांसाठीचे रुग्णालय दादा भुसे यांचा प्रयत्नाने उभे राहिले आहे.काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल या नावाने शेतकी महाविद्यालय उभारण्यात दादा भुसे यांचा मोठा वाटा आहे. भुसे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुसज्ज वाचनालय उभारले.दादा भुसे यांच्या प्रयत्नाने शहरात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या भागांना जोडण्यासाठी दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मौसम नदीवर पूल उभारण्यात आला आहे.
उबाठा उमेदवार तिसर्या क्रमांकावर
दादा भुसे यांचा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेचा केला होता. अद्वय हिरे यांना पक्षात घेऊन ताकद देण्यात आली होती. मात्र मालेगाव बाह्य मतदारसंघातील सामान्य जनतेने आपले दान दादा भुसे यांच्याच पदरात टाकले. दुसऱ्या आणि तिसर्या क्रमांकाच्या उमेदवारांनी मिलेवलेली एकूण मते ही देखील दादा भुसे यांच्या मतांपेक्षा तब्बल ६० हजार ने कमी आहेत.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
युद्धामुळे सोन्याच्या दराचा भडका! 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.63 लाखांच्या पार; पहा मुंबई-पुण्यातील रेट -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा











Click it and Unblock the Notifications