Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बापरे ! मुंबईत इनोव्हा कारमध्ये सापडले कोट्यवधी रुपये; निवडणुकीत पैसेवाटपाचे तिसरे प्रकरण उघड

Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. परंतु, त्यापूर्वीच पैशाच्या वाटपांवरुन राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर मंगळवारी पैसे वाटपाचा आरोप झाला. त्यानंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या कंपनीच्या एका अधिकाऱ्याला नोटा वाटताना पकडण्यात आलं. हा वाद थांबलेला नसताना, आणखी एक प्रकरण समोर आलंय.

Maharashtra Assembly Election 2024

कारमध्ये सापडले कोट्यवधी रुपये

गोरेगाव पूर्व मधील दिंडोशी मतदारसंघातील मंत्री पार्क सोसायटीमध्ये एका इनोवा कारमध्ये कोट्यवधी रुपये सापडले. गोरेगाव पूर्व दिंडोशी विधानसभेचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांच्याशी संबंधित ही कार असल्याची चर्चा रंगली आहे. ही इनोवा कार मंत्री पार्क सोसायटीच्या समोर उभी होती. यातून रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलीस कार जप्त करुन पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. या कारवर शिंदे गटाच्या नेत्याचा स्टीकर होता. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. गाडी सापडलेले पैसे कोणाचे आहेत? याचा शोध सुरु आहे. निवडणुकीआधी इतकी मोठी रक्कम का ठेवण्यात आली होती? या प्रकरणाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

विनोद तावडे प्रकरणही चर्चेत

काल म्हणजेच मंगळवारी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाला. यावरुन मोठा गदारोळ झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पाच कोटी रुपये आणून वाटल्याचा आरोप केला होता. विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, असं तावडे यांनी म्हटलं आहे. सीसीटीव्ही चेक करावे, त्यानंतर सत्य समोर येईल. "नालासोपारा येथे आमदारांची बैठक होती. म्हणून मी आदर्श आचार संहिता आणि वोटिंग मशीन सील करण्याची पद्धत समजावण्यासाठी गेलो होतो" असं तावडे यांनी सांगितलं.

बारामती अँग्रोचा अधिकारीही सापडला

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती एग्रो कंपनीचे अधिकारी मोहिते यांना पैसे वाटताना पकडण्यात आलं आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नोटांचे वाटप सुरु होतं, असा आरोप भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी केला. या दरम्यान बारामती अँग्रोच्या या अधिकाऱ्याला पकडण्यात आलं आहे. मोहितेकडे पोलिसांना एक यादी सुद्धा सापडली आहे. या लिस्टमध्ये सर्व माहिती आहे. आतापर्यंत किती लोकांना पैसे दिलेत आणि किती लोकांना वाटायचे आहेत, याची ती यादी होती असं सांगितलं जातंय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+