टेंभी नाका येथील आनंद आश्रमात नोटा उधळल्या, व्हिडिओ व्हायरल करत ठाकरे गटाची टीका
Anand Dighe Ashram : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संबंधित व्हिडिओ ट्विट केला आहे. केदार दिघे हे ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. ते म्हणाले की, तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला. असं केदार दिघे म्हणाले आहेत. केदार दिघे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

ढोल वादनाची 1980 पासूनची परंपरा
ठाकरे गटाकड़ून टीका करण्यात आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून यावर सारवासारव केली गेली. यासंदर्भात सांगण्यात आले की, एक ढोल पथक आंनंद आश्रमात आलं होतं. यावेळी संबंधित प्रकार घडला. विशेष म्हणजे गणेशोत्सवात संबंधित ढोल पथक आनंद मठात येणं ही मोठी परंपरा असल्याचं सांगण्यात आलं. ही परंपरा 1980 पासून या ठिकाणी साजरी केली जाते. आनंद दिघे हयात असताना देखील संबंधित ढोल पथक आनंद मठात येत असे आणि जल्लोष होत असायचा. तीच प्रथा आताही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….
— Kedar Dighe (@MiKedarDighe) September 13, 2024
दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…
आमचा आनंद हरपला ! @TV9Marathi @saamTVnews @zee24taasnews @abpmajhatv @lokmat @SaamanaOnline pic.twitter.com/C5xKkoaTvk
शिंदेसेनेला फटका बसण्याची शक्यता?
संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. तर आनंद आश्रम हे अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने आगामी काळात शिंदेंच्या शिवसेनेला टीकेला सामोरे जावे लागणार आहे. तर आगामी काळात शिवसेनेला फटका देखील बसू शकतो.
ओवाळून टाकलेल्यांनी आम्हाला शिकवू नये
आनंद दिघे यांची परंपरा आणि त्यांनी सुरू केलेले उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे नेत आहेत. गणपती विसर्जनानंतर ढोल पथके आनंद दिघे यांना भेटण्यासाठी टेंभीनाक्यावर यायची, तेव्हा दिघे हे त्यांना बक्षिस द्यायचे. ही दरवर्षीची प्रथा आहे. परंतु काही लोक आनंद आश्रमातील व्हिडिओ चुकीचे पद्धतीने प्रसारित करत आहेत. तसेच कार्यकर्त्यांची पैसे वाटण्याची पद्धत चुकीची असल्याने त्यांच्यावर पक्षाने करवाई केली आहे. मात्र ज्यांना ओवाळून टाकले, त्यांनी आम्हाला दिघे साहेब काय आहेत हे शिकवू नये, अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना दिली.












Click it and Unblock the Notifications