Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय आहे दादरच्या हनुमान मंदीराचा वाद..? इतिहास, राजकारण... वाचा संपूर्ण माहिती

Dadar's Hanuman Mandir case- दादर परिसरात असलेल्या हनुमान मंदीराला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली. त्यानंतर हे हनुमान मंदीर अचानक चर्चेत आलं. हे मंदीर दादर रेल्वे स्टेशन परिसरातील हमालांनी बांधल्याचं सांगितलं जातं. या मंदीराला 80 वर्षाचा इतिहास असल्याचंही सांगण्यात येतं. आता याच मंदीरावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. हिंदूत्ववादी सरकार म्हणून भाजपनेच या मंदीराला नोटीस पाठविली म्हणत उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टिका केली तर आता भाजपचेचे किरीट सोमय्यासारखे नेते रेल्वे प्रशासनाला ही नोटीस मागे घेण्याचे सुचवताना दिसत आहेत. नेमकं हे मंदीर प्रकरण काय, त्याचा इतिहास काय, याच प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात...

Dadar s Hanuman Mandir

मंदीराला 80 वर्षांचा इतिहास

दादरमधील हे मंदिर 80 वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. दादर रेल्वे स्थानकावरील हमालांनी हे मंदीर बांधलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सेवा केली जाते. हुनुमानाची ही मुर्ती तेथील एका झाडाखाली सापडली होती. त्यानंतर त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ज्या ठिकाणी 80 वर्षांपूर्वी मुर्तीची स्थापना झाली तेथेच हे मंदिर बांधण्यात आलं, असं मंदीराचे विश्वास्थ प्रकाश कारखानीस यांनी एका प्रसारमाध्यमाला सांगितले आहे.

मंदीराला मिळाली नोटीस

दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या बाहेरील हे हनुमान मंदीर अनधिकृत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. शिवाय 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी ते स्वत: पाडावे किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल, अशी नोटीस या मंदीराच्या विश्वस्थांना देण्यात आली आहे. त्यानंतर हे मंदीर अचानक चर्चेत आलं. मंदीर जर रेल्वे प्रशासनाने पाडलं तर त्याचा खर्चही विश्वस्थांकडून वसूल केला जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. आता यावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

मंदीरावरुन तापले राजकारण

आमच्याकडे या मंदीराचे सगळी कागदपत्रे आहेत. सगळे पुरावे आहेत. ते अतिक्रमीत नाही, असं मंदीर विश्वस्थांचं म्हणणं आहे. दुसरीकडे हनुमान मंदिर आणि बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला आहे. एका फोनमध्ये मोदींनी युक्रेनचं युद्ध थांबवलं. आता त्यांनी दादरचं हनुमान मंदीर व बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे विभागाला पत्र पाठवलं. दादरला हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटीसीचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं असल्याचंही सोमय्या यांचं म्हणणं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+