नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन! हैदराबाद येथील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Nanded congress MP Vasant Chavan : नांदेडचे खासदर वसंत चव्हाण यांचं आज पहाटे हैदराबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
मध्यरात्री त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना तातडीनं हैदराबाद इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर पहाटे 4 वाजता त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

दोन महिन्यांपुर्वीच विजयी
खासदार वसंतराव चव्हाण हे 70 वर्षांचे होते. 2024 च्या निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा 59 हजार 442 मतांनी पराभव केला होता.
13 ऑगस्टला रुग्णालयात
नांदेड येथे 11 ऑगस्ट रोजी काँग्रेसची विभागीय आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी तातडीने खासदार वसंतराव चव्हाण यांना एअर ॲम्बुलन्सने हैदराबादला हलवण्यात आले होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. ते डायलिसिसवर होते 13 ऑगस्टपासून त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू होते.
नायगाव येथे अंत्यसंस्कार
आज, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता.
वसंत चव्हाण अस्वस्थ वाटू लागल्यानं कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातील नांदेड येथील रुग्णालयात त्यांना दाखल केलं. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वसंत चव्हाणांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठीएअर अॅम्ब्युलन्सने हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.
खासदार वसंत चव्हाण यांची कारकीर्द
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅग्रीचे अध्यक्षही होते.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications